पुणे (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , ” जागृती महिला व बालकल्याण संस्था ” या नामांकित संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात सन 2026 च्या निकालानुसार इयत्ता 10 वी व 12वी परीक्षेत 80 % आणि त्यावरील गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार हा शिक्षण क्षेत्रातील तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून , विद्यार्थ्यांना दिग्गज मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शनही लाभणार आहे.

यावेळी विद्यमान शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर , विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले , बँकिंग क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर विद्याधर अनासकर त्याचप्रमाणे पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे श्री कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे .

