पंंढरपूर (प्रतिनिधी) : नुकताच आषाढी वारीचा भव्य दिव्य सोहळा भुवैकूंठ पंढरी नगरीत संपन्न झाला.
अतिशय उत्साहात, शांततेत व निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडला. याबद्दल ओंकार बसवंती (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जिल्हा प्रमुख, पंंढरपूर मंगळवेढा) यांनी शासनाचे व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बसवंती यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांची पंढरीतून पायी चालत पाहणी केली होती. भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा प्रशासनाकडून दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त झाल्याचं आढळलं.
यासाठी सोलापूर चे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद सर, पंंढरपूर चे प्रांताधिकारी सचिन इथापे सर, डीवायएसपी अर्जुन भोसले सर तहसिलदार लंगुटे सर, पंंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे सर व मंदिर समिती चे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी शेळके सर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सर या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

पंढरीची आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच बसवंती यांनी आभार व्यक्त केले आहेत. यासाठी या सर्वांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे, यांचे जाहीर आभार.