Pandharpur Live News : ‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद, “कर्माटेक २०२५” मध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण

Pandharpur Live News : ‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद, “कर्माटेक २०२५” मध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण

Loading

पंंढरपूर (प्रतिनिधी) : अभियांत्रिकीचे ज्ञान हे ताकद आहेच तरी त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे ही त्याहून मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजातील वास्तविक प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. तसेच व्यवहाराभिमुख शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे.

सहयोगाचे कौशल्य हे महत्वाचे कौशल्य आहे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी एक तरी फॉरेन भाषा शिकली पाहिजे, समाजातील वास्तविक प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प साकारायला हवेत असे सांगताना संवाद कौशल्य सुधारण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. तसेच या तंत्रपरिषदेतून मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होऊन नवीन शोध जन्माला येतील असा विश्वास टाटा कन्सल्टन्सी चे अधिकारी दिनेश कोथावदे यांनी व्यक्त केला.

२६ एप्रिल २०२५ रोजी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) शेळवे पंढरपूर मध्ये आयोजित केलेल्या “कर्माटेक २०२५” या राज्यस्तरीय तंत्र परिषेदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच त्यांनी महाविद्यालयाची ओळख करून देऊन स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


“कर्माटेक २०२५” तंत्रपरिषदेचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी प्रस्तावना करून हा परिसंवाद आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला.


याप्रसंगी बोलताना श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक म्हणाले की विद्यार्थ्यानी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर हा समाजाभिमुख कामांसाठी केला पाहिजे. सध्याचे युग हे जरी कृत्रिम बुद्धीमत्तेचे असले तरी त्याला माहिती पुरविण्याचे महत्वाचे काम हे कुशल मनुष्यबळावर च अवलंबून आहे. विद्यार्थ्यानी नवीन तंत्रज्ञाची ओळख करून घेऊन त्याचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे आवाहन ही त्यांनी भावी अभियंत्यांना केले.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचा अश्या टेक्निकल स्पर्धेमध्ये सहभाग अतिशय महत्वाचा असून टेक्निकल स्पर्धाच अभियांत्रिकीचे शिक्षण व इंडस्ट्री यातील दुवा आहे असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामद्धे ही कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.


सदर च्या परिषदेमध्ये मध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल प्रेझेंटेशन, आयडिया प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, ब्रिज मोडेल मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, प्रोजेक्ट एक्सिबीशन, सी हंट, ग्रीन बिल्डिंग, सर्किट सुडोकू अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील सुमारे ७५० हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण सुमारे पन्नास हजाराहून अधिक रुपयाची बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप पप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महावियालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता उपस्थित होते. संयोजक डॉ अभय उत्पात, सह संयोजक प्रा. दीपक भोसले, अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ. एस एम लंबे, प्रा. अनिल बाबर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रियाज नदाफ व भाग्यश्री बोरगी या विद्यार्थ्यानी केले. प्रा. जे एल मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

मेकॅनिकल डिपार्टमेंट
आयडिया प्रेझेंटेशन :
विजेता: प्राजक्ता पोळ आणि स्वरूप आराध्ये ऑर्चिड कॉलेज सोलापूर.
उपविजेता : राकेश सुतार आणि चंद्रशेखर विजापुरे स्वेरी कॉलेज पंढरपूर

प्रोजेक्ट एक्जीबिशन
विजेते: संग्राम आसबे आणि ग्रुप कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे
उपविजेता : रोहित पवार आणि ग्रुप स्वेरी कॉलेज पंढरपूर

पोस्टर प्रेसेंटेशन
विजेते: गायत्री कटके आणि ग्रुप श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर

उपविजेते : ईशा राठोड आणि ग्रुप श्री सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर.

सिव्हिल इंजिनिअरिंग
ब्रिज मॉडेल मेकिंग स्पर्धा
विजेते: माधुरी पांढरे आणि ग्रुप कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे
उपविजेते : महेंद्र पोटाबत्ती आणि ग्रुप..ऑर्चिड कॉलेज सोलापूर

प्रोजेक्ट एक्जीबिशन
अथर्व रोकडे कर्मयोगी इन्स्टिट्यूट
ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे
उपविजेते : नेहा पाटील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे

ग्रीन बिल्डिंग स्पर्धा
विजेते: महेश घोडके आणि ग्रुप कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे
उपविजेता : वैभवी कुंभारे आणि ग्रुप ऑर्चिड कॉलेज सोलापूर

इ अँड टी सी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स क्विझ
विजेते: सुभाष बिडारी एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर
उपविजेते: सुरज पोगुल एन बी एन सिंहगड कॉलेज सोलापूर

प्रोजेक्ट एक्झिबिशन
विजेते: स्वरूप आराध्ये आणि ग्रुप एन बी एन सिंहगड कॉलेज सोलापूर
उपविजेते : केसकर पुष्पांजली आणि ग्रुप कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक शेळवे

सर्किट सुडोकू स्पर्धा
विजेते: सुरज पोगुल एन बी एन सिंहगड कॉलेज सोलापूर
उपविजेते : रोहित कुंभार आणि ग्रुप कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे

कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग स्पर्धा
प्रोजेक्ट एक्जीबिशन
मन्मित माने आणि ग्रुप ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर
उपविजेते : कार्तिकेय बेलमकर आणि ग्रुप ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर

टेक्निकल प्रेझेंटेशन :
विजेते: प्रतीक मोहंती आणि ग्रुप ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर
उपविजेते : शालगर स्वयम ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर

सि हंट स्पर्धा
विजेते: अक्षय कोकरे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे
उपविजेते प्रथमेश माने कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *