सोलापूर: जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हरवलेल्या ५५ मोबाईल व एका टॅबचा तांत्रिक पद्धतीने शोध लावला. एकूण १० लाख १३ हजारांचा मुद्देमाल शहरासह परजिल्हे व परराज्यातून हस्तगत केला.
जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व टॅब हरवल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांनी त्याबाबत तपास करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिले होते. त्यानुसार त्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील – सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हरवलेल्या मोबाईल, टॅबचे सीडीआर मिळविले. तांत्रिक पद्धतीने त्यांचा शोध लावला.
पोलिस निरीक्षक चाटे, भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील – सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल बाबर, देकाणे, वायदंडे, सायबरचे अर्जुन गायकवाड, प्रकाश गायकवाड यांनी ही कामगिरी केली.