पुणे; घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, 61 गॅस टाक्यांसह टेम्पो केला जप्त

पुणे; घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, 61 गॅस टाक्यांसह टेम्पो केला जप्त

Loading

वेगवेगळ्या ठिकाणाहून घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या गोळा करुन त्या काळाबाजारात विकणार्‍यास सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तब्बल ६१ गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि टेम्पो असा ४ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

विकास धोंडाप्पा आकळे (वय ३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक, मुळ रा. डोंगरगाव ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या रा. रिद्धीसिद्धी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहेसिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार सागर शेडगे व अमोल पाटील यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दत्त मंदिर निवृत्तीनगरकडे जाणार्‍या रोडचे बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एक जण अनाधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडरची चोरुन विक्री करीत आहेत.

ही बातमी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली़ त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मोकळ्या मैदानात एक टेम्पो उभा दिसला.

टेम्पोमधून विकास आकळे हा गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा साठा करुन विक्री करताना दिसून आला. पोलिसांनी भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरातील एकूण ६१ टाक्या व एक टेम्पो असा ४ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. विकास आकळेहा वेगवेगळ्या वितरकाकडून गॅस सिलेंडरच्या टाक्या विकत घेऊन त्या दामदुप्पट दराने छोट्या, घरगुती व्यावसायिकांना विकत होता.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास बांदल यांच्या पथकाने केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *