लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद;शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालुन झाले होते फरार

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद;शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालुन झाले होते फरार

Loading

लोणी काळभोर: जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता.23 डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोन्या घायळ व त्याचा साथीदार अविनाश कामठे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोन्या घायळला सासवड येथील पुरंदर सिटी परिसरातून बुधवारी (ता.8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. तर अविनाश कामठे याला लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ (वय-29, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली) व अविनाश कामठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या अगोदर लोणी काळभोर पोलिसांनी गणेश गोडसे व श्रीकांत मेमाणे यांना अटक केली आहे. याप्रकरणी विजय श्रीरंग काळभोर (वय-46, रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये सोमवारी काम करीत होते. तेव्हा तेथे आरोपी सोन्या घायाळ व त्याचे साथीदार मोटार सायकल वरुन आले. सोन्या घायाळने फिर्यादी विजय काळभोर यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच सोन्या घायाळच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व दगडांनी काळभोर यांना मारहाण केली.या मारहाणीत विजय काळभोर हे जखमी झाले होते.

याप्रकरणी विजय काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या घायळ व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 109,118 (2),189 (2),189 (4) 190, 352, 351 (3) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37 (1) (3) सह १३५ व क्रिमिनल लॉ. आर्म अक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सोन्या घायळ व अविनाश कामठे हा फरार झाला होता.

दरम्यान, सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कायद्याचा वाचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने तडीपार सुद्धा केले आहे. मात्र त्याची गुन्हेगारीवृत्ती अद्यापही थांबलेली नाही. त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व त्याची गुन्हेगारी मोडीत काढून आरोपीला पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची पथके तयार केली होती.

सदर पथके ही सोन्या घायळ व अविनाश कामठे याच्या मागावर होती. आरोपीचा तपास करीत असताना, पोलिसांना आरोपी सोन्या घायळ हा सासवड येथील पुरंदर सिटी परिसरात येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपी सोन्या घायळला मोठ्या शिताफीने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. तर अविनाश कामठे यालाही पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातून बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार केतन धेंडे, गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे, तेज भोसले, दिगंबर जगताप यांच्या पथकाने केली आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *