- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september 2017
पंढरपूर-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरींग विभागात ‘सेसा’(सिव्हील इंजिनिअररिंग स्टुडंट असोशिएशन) कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे उपस्थित होते.
या संशोधनात्मक कार्यक्रमात जेष्ठ विश्वस्त रोंगे म्हणाले की, ‘येथील विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी मधील ज्वलंत प्रश्नांवर विचार मंथन करून यावर कल्पकतेने व संशोधनात्मक पद्धतीने योग्य नियोजन व मूल्यमापन करून तशी प्रतिकृती तयार करून भविष्यातील भारत घडविला आहे. असेच कार्य करत राहिले तर भविष्यात स्थापत्य अभियंत्यांकडून ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.’ यावेळी प्रचंड परिश्रम घेवून तयार केलेल्या प्रतिकृती पाहून प्राचार्य डॉ. रोंगे यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी मधील विविध विषयांवर मॉडेल्स तयार केले होते. यामध्ये पाल्म आयलँड, अंडर ग्राउंड मेट्रो, सस्पेन्शन ब्रीज, मोठमोठी धरणं, रोड नेटवर्क, स्वेरी महाविद्यालयाची प्रतिकृती, झुकता मनोरा, आयफेल टॉवर असे विविध मॉडेल्स तयार करून विद्यार्थ्यांनी संपूर्ण सिव्हील विभाग आकर्षक बनविले होते. सेसाचे समन्वयक प्रा. श्रीकृष्ण गोसावी, विद्यार्थी अध्यक्ष हितेश पायगण, उपाध्यक्ष श्रद्धा पावले, सचिव विकास माने, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. संपूर्ण दिवसभर सिव्हील विभाग पाहण्यासाठी बाहेरील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती तर काही विद्यार्थ्यांनी सेल्फी घेवून आपल्या कॅमेऱ्यात क्षणचित्रे कैद करत होते. विभागाच्या भिंती फुगे, रंगबिरंगी पताके, सविस्तर माहिती दर्शविणारे पत्रके, जगातील प्रसिद्ध व अदभूत असणाऱ्या भव्य इमारतींची प्रतिकृती व विविध मॉडेल्सने सजले होते. या सजावटीची पाहणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राद्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक करत होते. यासाठी सिव्हील विभागाचे विभागप्रमुख डॉ. एन. व्ही.खडके, प्रा.एम.एम.पवार, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, यांच्यासह इतर प्राद्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
छायाचित्र- १.श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या सिव्हील विभागात सेसा या सिव्हील विभागातील कार्यक्रमाचे उदघाटन करताना संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे सोबत विभागप्रमुख डॉ. एन. व्ही.खडके व आदी मान्यवर.
२. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘सेसा’मधील विविध प्रतीकृतींची पाहणी करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे,संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विभागप्रमुख डॉ. एन. व्ही.खडके, प्राद्यापक वर्ग व विद्यार्थी.
From-Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

