👁 9 Views

स्वेरीत ‘स्पीक मॅके’चा कला संगीताचा कार्यक्रम संपन्न वाद्यांच्या विविध प्रकाराने विद्यार्थी उत्साहीत

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 27 september  2017 

 पंढरपूर– हरताळ, वीणा, हार्मोनियम, शालिनी, सतार , ढोलक , मोरचंद, बपंग, सारंगी असे संगीतातील विविध प्रकारांच्या वाद्यांनी व त्यावर गायलेल्या सुरातील प्रत्येक गाण्यांनी स्वेरीअंतर्गत असणाऱ्या चारही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सायंकाळ आनंदमय करणारी ठरली.

          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजस्थानी लोकसंगीत व वाद्यांवर आधारित ‘स्पीक मॅके’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी सनई वादक बिस्मिल्ला खान पुरस्कार विजेते भट्टेखान मंगेनिया यांनी राजस्थानी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरवात केली पुढे दादाखान, मुस्ताक खान, पप्पू खान, रोशन खान, हुसेन खान यांनी संगीताच्या मैफलीला चार चांद लावले. क्लास व प्रॉक्टर क्लास संपवून विद्यार्थ्यांनी थेट ओपन अँफी थिएटरकडे धाव घेतली. राजस्थानी कलावंतांच्या प्रत्येक गीताला विद्यार्थी भरभरून दाद देत होते. जी संगीत वाद्य नामशेष होताहेत त्याच वाद्यांच्या सहाय्याने सुंदर असे गीत साकारत होते. बहारदार कार्यक्रमानंतर बोलताना राजस्थान राज्यात स्थित असलेले ‘स्पीक मॅके’चे प्रमुख भट्टेखान मंगेनिया म्हणाले की, ‘आम्ही विविध देशात हा कार्यक्रम सादर करत असतो. यापूर्वी युरोप, फ्रांस, नॉर्वे, जपान, इंग्लंड, जर्मनी अशा देशात जावून या पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम सादर केला. प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या व अशा कार्यक्रमामुळे लोप पावत चाललेल्या वाद्यांना नवसंजीवनी मिळत आहे. त्याच बरोबर ‘स्पीक मॅके’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये पाश्चात्य संगीताची आवड निर्माण व्हावी, राजस्थानची लोककला सर्वदूर पोचावी या हेतूने आम्ही विविध भागात ‘स्पीक मॅके’चा कार्यक्रम सादर करतो, आणि उत्तम प्रतिसादही मिळतो.’ असे सांगितले. येथील शिस्त व विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने राजस्थानी कलावंत भारावून गेले होते. संस्थेच्या प्रथेप्रमाणे सर्व कलावंतांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी ओंकार गायकवाड,अभियांत्रिकीचे उपप्रचार्य डॉ.एस.एन.कुलकर्णी, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य, प्रा.एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, अधिष्ठाता, प्राद्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व इंजिनिअरिंग, फार्मसी व एम.बी.ए.या अभ्यासक्रमातील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी, विभागामधील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा यशपाल खेडकर यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करन पाटील यांनी मानले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *