- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 28 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):-गुरसाळे, ता.पंढरपूर येथे ‘लक्ष्मी एचपी गॅस एजन्सी’ चे उद्घाटन खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हिंदुस्थान पेट्रोलियम एलपीजी गॅस कंपनी (एच.पी.गॅस) च्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या सेवेत ही एजन्सी सुरु करण्यात आली आहे.
खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व आ.भारतनाना भालके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेवक संतोषभाऊ नेहतराव, रयत शिक्षण संस्थेचे संचालक राजुबापु पाटील, विठ्ठलचे व्हा.चेअरमन लक्ष्मणआबा पवार, माजी व्हा. चेअरमन मोहन कोळेकर, विजयप्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दिपकदादा वाडदेकर, सुधाकर कवडे, माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव, समाजसेवक रामभाऊ गायकवाड, दिपक शिंदे, दिलीप साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा.विजयसिंह मोहिते-पाटील व आ.भारतनाना भालके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व गॅस एजन्सी वितरकांना शुभेच्छा देत या एजन्सीमार्फ त ग्रामीण व शहरातील गॅसधारकांना जास्तीत जास्त सुलभरित्या सोयी पुरवण्यात याव्यात असे आवाहन केले.
एच.पी.एलपीजी गॅसच्या ग्राहकांना केंद्र सरकारच्या सर्व सोयी-सुविधा ‘लक्ष्मी एचपी गॅस एजन्सी’ मार्फत पुरवण्यात येणार आहेत. पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांनी या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्वरीत आपली नोंदणी या फर्मकडे करावी. असे आवाहन या एजन्सी चे वितरक गणेश ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


