- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मंगळवेढा प्रतींनिधी :- विविध नावीन्यपूर्ण उपक्रमात कायमच अग्रेसर असणार्या युटोपीयन शुगर्स ने सुधा शुगर्स या नावाने नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. या ब्रँड द्वारे 1,3 व 5 किलो, ची दर्जेदार साखर आकर्षक अशा पॅकिंग मध्ये बाजारात आणली आहे. सदरच्या ब्रँड ची चाचणी करण्याच्या उद्देशाने होलसेस विक्रेते, मोठमोठे मॉल यांच्या माध्यमातून बाजारात विक्री केली असता या ब्रँड ला ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे मत कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी व्यक्त केले.
युटोपीयन च्या चौथ्या बॉयलर अग्निप्रदीपण प्रदीपन समारंभ प्रसंगी पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते सुधा ब्रँड चे उदघाटन करण्यात आले आहे. या साखरे मुळे बाजार पेठेचा फायदा घेत जास्तीचा दर मिळवणे शक्य होणार आहे व त्याचा फायदा युटोपीयन च्या ऊस उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा दर देण्यासाठी होणार आहे.
तसेच युटोपीयन शुगर्स ने ऊस उत्पादकांना कारखान्या बाबत आपलेपणाची भावना निर्माण व्हावी या करीता शेअर्स विक्री करण्याचे ठरविले असून 5 एकर क्षेत्र असणार्या ऊस उत्पादकांना 1 शेअर्स, 10 एकर क्षेत्र असणार्या ऊस उत्पादकांना 2 शेअर्स या पद्धतीने शेअर्स खरेदी करता येणार आहे. प्रती शेअर्स ची किमत रु. 10,000/- असणार आहे तरी जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ प्रसंगी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले
फोटो ओळी :-
1) युटोपीयन शुगर्स उत्पादित सुधा या दर्जेदार साखर ब्रँड चे उद्घाटन करताना पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक,पांडुरंग सह. सा.का.चे मा. चेअरमन दिनकर भाऊ मोरे, मोहोळ तालुका पंचायत समितीचे मा. सभापती बाबासों क्षीरसागर, दामाजी कारखान्याचे मा. चेअरमन चरणू काका पाटील ,संस्थापक चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक, उत्तमराव पाटील, दिलीप चव्हाण.

