👁 9 Views

‘पाझर’ या मराठी चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांचा पंढरीत सत्कार

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017


 

‘पाझर’ या मराठी चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांचा पंढरीत सत्कार
पंढरपूर (प्रतिनिधी):- दादासाहेब फाळके यांच्या नावाचा पुरस्कार मिळालेला मराठी चित्रपट ‘पाझर’ निर्माते जगदीश जोजारे,  दिग्दर्शक अनिल केंगार यांचा व बालकलाकार ओम जोजारे यांचा सत्कार पंढरीतील इंदिरा गांधी भाजी मार्केट व छावा क्रांतीविर सेना यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी छावा क्रांतीविर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके म्हणाले की, ‘‘एक रिक्षावाला सर्वसामान्य माणुस जर राज्य पातळीवरील पुरस्कारप्राप्त चित्रपटाची निर्मिती करुन यशस्वी होत असेल आणि आपल्या पंढरपूरचे नांव सिनेसृष्टीत गाजवतोय ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांचे व त्यांच्या टीमचे कौतुकच केले पाहिजे. त्याचाच भाग म्हणून आम्ही त्यांच्या या सत्काराचे आयोजन केले आहे. निर्माता जगदीश जोजारे व अनिल केंगार यांनी अशीच उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करत रहावी व त्यांचे चित्रपट यशस्वी व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करतो.’’ 
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अरुणकाका शिंदे व धनराज लटके यांच्या हस्ते निर्माता दिग्दर्शक व बालकलाकार ओम जोजारे, गीतकार ईश्‍वर पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी पंकज बहादुले, रमेश शेंबडे, माजी सरपंच महादेव शिंदे, यासीन बागबान, अनंता घाडगे महाराज, विशाल शेळके, विजय सगर, अशोक बोडके, इम्तियाज बागवान, अमन बागवान, विकास अलदर, शंभु पवार, किसन कोकरे, माजी नगरसेवक दिगंबर देवमारे, संजय बडवे, वाहीद बागवान, महादेव वाघमारे, अशोक बाबर, दादा गवळी, नागेश अर्तमवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *