👁 7 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने डेंग्यु सदृष्य साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी विशेष मोहीम

पंढरपूर Live 20 October 2017

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने डेंग्यु सदृष्य साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी विशेष मोहीम
मोहिमे अंतर्गत शहरातील टायर जप्त व युद्ध पातळीवर ब्लोअरद्वारे फवारणी सुरु
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे सदर मोहीमे अंतर्गत डेंग्यु सदृष्य साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना व तसेच स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. शहरात एकुण १७ हजार ५०० मालमत्ता व ५००० झोपड्या असुन यापैकी १३५०० घरांना समक्ष भेटी देवुन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे. यापैकी ९७६ घरांमध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये डास अळी (लारवा) आढळुन आले आहे. या दुषीत पाण्याच्या साठ्यामध्ये टेलिफाचे द्रावण टाकुन डासांच्या आळ्या नष्ठ करण्यात आलेल्या आहेत. तसेच शहरामधील १३०८ डासोत्पती स्थानावर हातपंपाद्वारे व ब्लोअरद्वारे डास अळी प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम चालु आहे. 
तसेच फॉगिंग मशीनद्वारे धुर फवारणी करण्यात येत आहे. शहरात ३७ ठिकाणी २१८ व ७६०० संडासांमध्ये बीटीआय लिक्विड फवारणी करण्यात आलेली असुन कंटेनर सर्व्हेच्या माध्यमातुन ९६० टायर्स जप्त करण्यात आलेले आहेत. पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये जनजागृतीव्हावी म्हणुन जिल्हा व स्थानीक वर्तमान पत्रातुन डेंग्यु साथ नियंत्रणा अतंर्गत जाहिर आवाहन केले असुन शहरातील स्थानिक न्युज या केबल नेटवर्कव्दारे देखील नारिकांना डेंग्यु साथ प्रतिबंधात्मक उपाय योजने बाबत जाहिर आवाहन चालु आहे. तदअनुषंगाने पंढरपूर शहरातील प्रमुख चौकाच्या दर्शनी भागामध्ये व शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य व हिवताप विभागा मार्फत २० डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत.

 सर्व वर्तमानपत्रांमधुन ५००० व कंटेनर सर्व्हेक्षणाचे वेळी घरामध्ये १५००० असे एकुण २०००० जाहिर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करण्यात येत आहेत. साथ नियंत्रमासाठी सुमारे ५० कर्मचा-यांद्वारे पंढरपूर शहरातील डेंग्यु साथ नियंत्रणासाठी कंटेनर सर्व्हेक्षणा अंतर्गत डास अळी आढळुन आलेल्या पाणी साठ्यामध्ये टेमीफॅासचे द्रावण टाकणे,प्रत्येक घरामध्ये जाहिर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करणे, फॅगींग मशीनने धुर फवारणी करणे,तात्पुरत्या स्वरुपातील डासोत्पत्ती स्थानांमध्ये व गटारीमध्ये डास अळी प्रतिबंधक औषध फवारणी करणे,डेंग्यु साथ प्रतिबंधात्मक उपाय योजने बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना आढवड्यातुन १ दिवस साठा केलेले पाणी रिकामे करुन कोरडा दिवस पाळावा व आपल्या घरांमध्ये टेरेस-गच्ची वर साठलेले पावसाचे पाणी त्वरीत कोरडे करावेत. जेणेकरुन डेंगीचा डास निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.  
डेंगीचा डास हा स्वच्छ पाण्यातच निर्माण होत असल्याने नागरीकांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अभिजीत बापट, आरोग्य समिती सभापती भाग्यश्री शिंदे यांनी केले असुन डेंग्यु सदृष्य साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी हाती घेण्यात आलेली विशेष मोहीम उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्यअधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, हिवताप पर्यवेक्षक डी.एफ.गजाकोष, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, महादेव अदापुरे, बर्मा पवार, कुमार भोपळे हे यशस्वीपणे राबवित आहेत.

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!

  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *