कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..!
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
वाखरी येथील अपघातात पंढरपूरमधील तरूणाचा करूण अंत
पंढरपूर Live 1 November 2017
पंढरपूर-पुणे रोडवर आज दुपारी 4 वाजता एसटीला मोटारसायकलने पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात पंढरीतील एका तरूणाचा करूण अंत झाला.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर कडे येणाऱ्या एस. टी. ला पाठीमागून मोटारसायकल ने धडक दिली. वाखरीजवळ झालेल्या या अपघातात मोटारसायकल (एम. एच. 13 सीजी 8822) वरील प्रविण कैलास शिंदे (वय 28), रा. गोविंदपूरा, पंढरपूर या तरूणाचा डोक्याला मार लागल्याने जागीच दुःखद करूण अंत झाला. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास एपीआय गाडे हे करीत आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




