👁 8 Views

सोलापुरातील 11 अनाधिकृत धार्मिक स्थळे हटवली

सोलापुरातील 11 अनाधिकृत धार्मिक स्थळे हटवली
पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017



सोलापूर, दि. 08, नोव्हेंबर – शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली. सलगरवस्ती, रामवाडी, पोटफाडी चौक, जगदंबा चौक, पाच्छा पेठ प रिसरासह अन्य भागातील 11 धार्मिक स्थळे हटवण्यात आली. पोटफाडी चौकात काहीनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. उद्याही मोहीम सुरू राहील, असे महापालिका बांधकाम  परवाना विभागाकडून सांगण्यात आले. 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात येत आहेत. नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. स्थळांची पाहणी करून तीन पथके  तयार करून पाडकाम मोहीम हाती घेण्यात आली. एका पथकात एक जेसीबी, अभियंता, कर्मचारी यांचा समावेश होता. या पथकाने मनपा झोन क्रमांक 6, 7, मध्ये कारवाई केली. 
मनपा झोन क्रमांक सहामध्ये तीन धार्मिक स्थळे हटवण्यात आली. त्यात सलगरवस्ती, दीक्षित हॉस्पिटलजवळील देवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर. झोन क्रमांक सातमध्ये रामवाडी  येथील हुसेन बाबा दर्गा, जगदंबा चौकातील जगदंबा मंदिर, दिवेकर बेकरीजवळ लक्ष्मी मंदिर, रेल्वे पोर्टर चाळ येथील मंदिर, नायडू घराजवळील मंदिर यांचा समावेश आहे. झोन  क्रमांक आठमधील पोटफाडी चौकातील म्हसोबा मंदिर काढताना काहीनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो हाणून पाडला. ते मंदिर हटवण्यात आले. तसेच न्यू  पाच्छा पेठेतील अंबाबाई मातंग मंदिर, कुमठा नाका परिसरातील दोन मंदिरे हटवण्यात आली.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *