👁 7 Views

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला तालुकाध्यक्षपदी जयश्री माडगुळकर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला तालुकाध्यक्षपदी जयश्री माडगुळकर यांची निवड
पंढरपूर Live 9 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी महिला पंढरपूर तालुकाध्यक्षपदी व्होळे, ता. पंढरपूर येथील जयश्री माडगुळकर यांची निवड करण्यात आली आहे. जिजामाता कार्यालय, इसबावी येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध सेलच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी जयश्री माडगुळकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपकआबा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे, राजुबापु पाटील, युवराज पाटील, दिपक पवार, सरचिटणीस लतीफ तांबोळी, महिला अध्यक्ष मंदा काळे, विधी सेल अध्यक्ष अमरजीत गोडसे, युवती अध्यक्ष यशोदा ढवळे, सेवादल अध्यक्ष विक्रांत माने, विद्यार्थी राज्य उपाध्यक्ष संकेत ढवळे, संदिप मांडवे, शहराध्यक्षा सौ.रंजना हजारे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा सौ.साधना रामचंद्र राऊत, शहराध्यक्षा मनिषा शिंदे, जि. कार्याध्यक्ष सुदामती माळी, युवती शहराध्यक्ष चारुशीला कुलकर्णी आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या निवडीबद्दल बोलताना जयश्री माडगुळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, ‘‘मी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेससाठी कार्य करत आहे. पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी कार्यात मी हिरीरिने सहभाग घेतलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील होते व यापुढेही राहीन. मी केलेल्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी व पदाधिकार्‍यांनी माझी निवड ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी करुन माझ्यावर खुप मोठी जबाबादारी सोपवलेली आहे. निश्‍चितच येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी पंढरपूर तालुक्यातील ओबीसी जनतेच्या संपर्कात राहून पार्टीची संघटनशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’’

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *