👁 10 Views

पंढरपूर तालुक्यातील कोतवाल पदांचे आरक्षण सोडत जाहीर…02 पदे महिलासांठी आरक्षित

पंढरपूर तालुक्यातील कोतवाल पदांचे आरक्षण सोडत जाहीर…02 पदे महिलासांठी आरक्षित



पंढरपूर Live 9 NOVEMBER 2017

पंढरपूर दि. 09 :- तालुक्यातील  रिक्त असलेल्या  कोतवाल पदांसाठी आरक्षण सोडत शेतकरी भवन, पंचायत समिती पंढरपूर  येथे चिठ्ठीपध्दतीने काढण्यात आले.  तालुक्यात  रिक्त असलेल्या 6  कोतवाल पदांपैकी 02 पदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.
               यावेळी तहसिलदार मधुसूदन बर्गे, पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, , मंडलाधिकारी एस.ए.मुजावर, तहसिल कार्यालयातील जी.ए.सगेल, यांच्यासह संबधित गावचे तलाठी, ग्रामसेवक तसेच नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
तालुक्यात अनुसुचित जमातीसाठी 04 व  इतर मागास प्रवार्गासाठी 2 जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये  अनुसूचित जमाती महिलासाठी मौजे गोपाळपूर व  इतर मागास प्रवर्ग महिलासाठी मौजे ओझेवाडी या दोन ठिकाणी कोतवाल पदासाठी महिला आरक्षण काढण्यात आले. तसेच  अनुसूचित जमातीसाठी नारायण चिंचोली, पटवर्धन कुरोली, गुरसाळे व इतर मागास प्रवार्गासाठी ओझेवाडी या सजांसाठी कोतवाल पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले.
           कोतवाल पदाच्या भरतीची जाहिर नोटिस 13 नोव्हेंबर रोजी  तहसिल कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर तसेच संबंधित गावच्या नोटिस बोर्डावर व दवंडी देवून प्रसिध्द करण्यात येणार आहे. दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळत कोतवाल पदासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जाची छाननी  दिनांक 23 ते 28 नोंव्हेबर या कालावधीत करण्यात येणार आहे.  कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी 75 गुणांची  लेखी परिक्षा घेण्यात आहे. तसेच  दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2017 या कालावधीत 25 गुणांची तोंडी परिक्षा घेवून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार मधूसूदन बर्गे यांनी दिली.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *