👁 9 Views

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या
अनुयायांना चांगल्या सुविधा द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पंढरपूर Live 13 NOVEMBER 2017

चैत्यभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबईदि. 13 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे सेवा सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करून अनुयायांना चांगल्या सेवा द्याव्यातअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या काळात इंदू मिल येथील स्मारकाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा मांडण्यात यावाअशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. या काळात बाहेरून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था करावीयासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. शिवाजी पार्क परिसरात बार्टीमार्फत अल्पोपहार व भोजनाची सोय यंदाही करण्यात येणार आहे. या काळात या परिसरात स्वच्छता रहावी यासाठी प्रयत्न करावेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तसेच दूरचित्रवाहिनीवृत्तपत्रे व आकाशवाणी या माध्यमांतून संदेशपर जाहिराती प्रसिद्ध करणेजय महाराष्ट्र व दिलखुलास या कार्यक्रमात विशेष प्रसारण करणेजिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बॅनर लावणे आदींचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी हे इंदूमिल येथील स्मारकाच्या जागेलाही भेट देतात. त्यामुळे तेथेही सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यास एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे.
तसेच स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.
बोरिवली येथील पॅगोडा येथे भेट देणाऱ्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात येणार आहेअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नागसेन कांबळे यांनी समन्वय समितीच्या मागण्या सादर केल्या. समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सूचना पत्रिका व माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झाले.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेगृह राज्यमंत्री दीपक केसरकरआमदार राज पुरोहितगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरपोलिस महासंचालक सतीश माथूर,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता,एमएमआरडीएचे सहआयुक्त प्रवीण दराडेकोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेउपाध्यक्ष महेंद्र साळवेरवी गरुडभदंत करुणानिधी थेरो यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *