👁 7 Views

कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ येथे बालदिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कर्मयोगी विद्यानिकेतन पाटखळ येथे बालदिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न



पंढरपूर Live 14 NOVEMBER 2017

    मंगळवेढा प्रतींनिधी :- भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो.याच निमित्ताने नव्यानेच स्थापन झालेल्या कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
      प्रारंभी युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमरावपाटील ,डॉ.शिर्के मॅटरनिटी होम चे डॉ.शरद शिर्के,शिवलक्ष्मी बालरुग्णालयमंगळवेढायेथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.सुरेश व्हनमाने ,सप्तसाई चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.हजारे,ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील डॉ.निखिल जोशी,आरबीएसके ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील डॉ.अनिल चौगुले,एएनएम ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील डॉ.अस्मा शेख आदींच्या शुभहस्ते पं.जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

      सदर प्रसंगी बोलताना डॉ.व्हनमाने म्हणाले की,पं.नेहरूंना लहान मुलांविषयी खूप आवड होती. लहान मुलां-मुली मध्ये,विचारांचे आदान-प्रदान व धर्माबाबतचे सामंजस्य वाढावे,व मुलां मध्ये असणारी खेळकर वृत्ती वाढीस लागून त्यांचे आरोग्य सूदृढ व्हावे,तसेच आयुष्य चांगले बनविण्याची संकल्पना त्यांच्यामध्ये रुजावी असा हेतु बालदिन साजरा करण्यामागे आहे.कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेने नेमका हाच हेतु ओळखून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या हेतूने आयोजित केलेले आरोग्य तपासणी शिबीर हे निश्चितच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारे आहे.
    या शाळेने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना गणवेश ,वॉटरबॅग,शूज,वह्या-पुस्तके,इतर शालेय साहित्य व पोषण आहार आदि सुविधा पुरविलेल्या आहेत.शाळेचे आकर्षक वर्ग हे विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ निर्माण करणारे असे आहेत. असे मत डॉ. व्हनमाने यांनी व्यक्त केले.
   लहानग्या विद्यार्थ्यांनी उपस्थित पाहुण्यांचे प्रारंभी गुलाब -पुष्प देवून स्वागत केले. व पाहुण्यांनी सर्व मुलांना गुलाब पुष्प देवून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या नंतर सर्व मुलांना खाऊ देण्यात आला. सदर प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक स्टाफ तसेच सर्व खाते प्रमुख ,व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
     कार्यक्रमाचे आभार प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती काळुंगे यांनी मानले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *