👁 8 Views

सोन्याच्या आशेने स्मशानातील राखेचीही चोरी..!! …अन्यथा ‘तिसर्‍याचा’ विधी नगर पालीकेच्या दारात करु- गणेश अंकुशराव !



पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017

पंढरपूर शहरात सातत्याने छोटया मोठया चोरीच्या घटना घडत असतात.कधी चोरीचा तपास लागतो तर कधी किरकोळ चोरीची तक्रार करण्यास नागरिकच पुढे येत नसल्याने भुरटया चोरांंचे चांगलेच फावते.मात्र आता पंढरीत चोरांनी कहर केला असून येथील स्मशानभुमीत प्रेताला अग्नी देवून आप्तेष्ठ बाहेर पडल्यानंतर येथील राखही सोन्याच्या आशेने गोळा करुन नेण्यापर्यंत या चोरटयांची मजल गेली आहे.काल पंढरीत महर्षी वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीचे शहर उपाध्यक्ष अक्षय म्हेत्रे यांच्या काकु सौ.नंदा अनंत म्हेत्रे यांचे काल दुखद निधन झाले.काल प्रेताल भडाग्नी दिल्यानंतर उद्या तिसर्‍याचा विधी आहे.दरम्यान या कटुंबातील काही सदस्य आज दुसर्‍या एकाच्या अंत्ययंात्रेला स्मशानात गेल्यानंतर काल अग्नी दिलेल्या ठिकाणची राख अस्थीसह भरुन नेल्याचे निदर्शनास आले.उद्या तिसरा असल्याने विधीसाठी आल्यानंतर क्रियाकर्म करण्यासाठी राखच शिल्लक नसल्याचे पाहताच या कुटुंबाने महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला.अधिक चौकशी केली असता महिलांच्या प्रेतास अग्नी दिल्यानंतर  नातेवाईक निघून गेले की चोरटे माग काढत येतात व महिलांच्या अंगावरील सोने या राखेत मिळेल या आशेने संपुर्णराखच अस्थीसह भरुन घेवून जातात अशी माहीती मिळाली.
                   या घटनेमुळे संपुर्ण समाजमन अतिशय संतप्त झाले असून स्मशानभुमीत यापुर्वीही असे प्रकार घडले असल्याचे निदर्शनास आले.पंढरपूर नगर पालीकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे गरजचे झाले आहे.आधिच स्मशानभुमीची दुरावस्था झालेली आहे.पावसाळ्याच्या दिवसात तर या ठिकाणी जाण्यासही रस्ता नसतो.अवैध वाळू वाहतुकीमुळे रात्रभर येथे वाळू चोरांचा वावर असतो यातच भरीस भर म्हणून चोरटे अक्षरश: प्रेतास अग्नी दिल्यानंतर राखही चोरून नेतात ही घटना अतिशय गंभीर आणि लोकांच्या भावनेला ठेस पोहचविणारी आहे अशी प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली.याबाबत त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे यांच्या व न.पा.चे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
     या गंभीर प्रकरणाची दखल घेवुन पंढरपूर नगर पालीकेने या ठिकाणी त्वतीत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी व सी.सी.टि.व्ही.बसविण्यात यावी अन्यथा पुन्हा अशा स्वरुपाची घटना घडल्यास तीसर्‍याचा विधी नगर पालीकेच्या दारात करुन असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *