👁 6 Views

‘खुर्चीसम्राट’ एन. रेळेकरांचा पंढरीत सन्मान



पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017

प्रतिनिधी/पंढरपूर
मराठी चित्रपट सृष्टीत शंभराहून अधिक चित्रपटातील प्रेक्षकांसमोर अजरामर भूमिका साकारणारे लेखक, दिग्दर्शक एन. रेळेकर यांचा रविवार दि. १९ रोजी येथील त्यांच्या सहकार्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी दिग्दर्शित केलेला छंद प्रितीचा हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रिमीयर शोसाठी ते पंढरीत आले होते. यावेळी त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि इतर कलावंत यांच्या समवेत त्यांची बैठक झाली. यावेळी कलावंतांच्या वतीने एन. रेळेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रवींद्र शेवडे, विनय महाराज बडवे, अरविंद झेंडे, मधू झेंडे आदी उपस्थित होते.
पंढरपूर ही आपली कर्मभूमी असल्याने येथूनच लाखातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला असून पंढरीशी आपला मोठा ऋYणानुबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
एन. रेळेकर यांनी दिग्दर्शित केलेला छंद प्रितीचा हा चित्रपट ढोलकीवादक आणि नर्तिका यांच्यातील अनोख्या गुंतागुंतीच्या प्रेमसंबंधावर आधारित आहे. लावणीप्रधान असणाºया या चित्रपटातील हलक्या फुलक्या विनोदांनी प्रेक्षकांना आनंदित करणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जुन पाहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आजवर सुमारे १०० चित्रपटातून आपण काम केले असून देखणी बायको, गावरान गंगू, खुर्चीसम्राट आदींसह आठ चित्रपटांचे लेखक, पटकथा, दिग्दर्शन, एन. रेळेकर यांनी केले आहे. १९६० मध्ये नांदायला जाते या चित्रपटातून सोंगाड्याची भूमिका साकारून चित्रपटात एन्ट्री करणाºया एन. रेळेकर यांनी मराठी अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रतिभावंत अभिनेते समवेत काम केले आहे. एन. रेळेकर यांनी पंढरीतील बैठकीत येथील कलाकारांसोबत पंढरपूर समोर ठेवून एखादा विषय हाताळून एखादी नवी कलाकृती निर्माण करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी अजित व्यवहारे, अमित गायकवाड, यशवंत सोंडकर आदी उपस्थित होते.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *