👁 9 Views

‘त्या’ 4 चिमुकल्यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत सुपूर्द



पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी) : चंद्रभागा नदीच्या पात्रात वाळू उपशाच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे पोहायला गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या मुलांच्या कुटूंबियांना शासनाने मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
चंद्रभागेच्या पात्रात वाळू उपशांमुळे पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार बालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र पंढरपूर तहसील कार्यालयाने चुकीचा अहवाल पाठविल्याने सदर बालकांच्या कुटूंबास आर्थिक मदत मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे युवा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी तहसीलदार पंढरपूर यांच्याकडून पूर्वी पाठविण्यात आलेला अहवाल दुरुस्त करून पुन्हा अहवाल पाठवावा, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण केले होते.
या उपोषणाला विविध राजकीय पक्ष, संघटना आणि जेष्ठ व्यक्तींनी पाठिंबा दर्शविला होता. आ. भारत भालके यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांच्याशी संपर्क साधून सदरच्या बालकांच्या कुटूंबियांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोळी महासंघचे संस्थाध्यक्ष रमेश पाटील यांनीही या उपोषणाबाबत माहिती घेऊन शासनस्तरावर थेट संपर्क केला होता. त्याचाच परिणाम म्हणून नदी पात्रात वाळूच्या उपश्यामुळे पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मयत झालेल्या शहापूरकर आणि जुमाळे कुटूंबास शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
‘त्या’बालकांच्या मदतीसाठी तीन मंत्र्यांचा पुढाकार
वाळू उपशामुळे नदी पात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे गवळी समाजातील चार निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या दुसर्‍याच दिवशी राज्याचे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी जुमाळे व शहापूरकर कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे नुसते सांत्वनच केले नाही तर त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्वरीत मदत देण्याकामी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आदिवासी मंत्री विष्णू सावरा, सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मृत मुलांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ही मदत देण्यात आली आहे.
फोटो ओळ : सिद्धाप्पा विठ्ठल जुमाळे, सुनिल पोपट शहापूरकर व अनिल पोपट शहापूरकर या पालकांना आज पंढरपूर तहसील कार्यालयात तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार सुरेश तिटकारे, भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर, गवळी समाजाचे राजाभाऊ शहापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी बबुल बोराळकर, बाळासाहेब बळवंतराव, संदिप मुटकुळे, लखन ननवरे, विकी दंदडे, श्रीकांत ननवरे, धीरज करकंबकर, गणेश अंकुशराव, दगडू कांबळे, रामचंद्र गोडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *