काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोपाळपूर येथील आण्णासो आसबे याचे व त्याच्या पत्नीचे आपसात भांडण चालु झाले. हे भांडण विकोपाला जाऊन आण्णासो आसबे याने रागाच्या भरात आपली पत्नी ऐश्वर्या स लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत ऐश्वर्या आण्णासो आसबे (वय 22) या विवाहितेचा मृत्यु झाला. ऐश्वर्याच्या नाकातून कानातून रक्तस्त्राव झाल्याने व मुका मार लागल्याने तिचा मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते.
या घटनेची माहिती आज दि.26-11-2017 रोजी सकाळी 6 वा. पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. ऐश्वर्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असून. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





