👁 9 Views

शहीद मेजर कुणाल गोसावी स्मृतीदिनानिमित्त… भाजपाच्या वतीने पंढरपुरात स्वाभिमान रॅलीचे आयोजन

शहीद मेजर कुणाल गोसावी स्मृतीदिनानिमित्त…

भाजपाच्या वतीने पंढरपुरात स्वाभिमान रॅलीचे आयोजन



पंढरपूर Live 26 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी) : अतिरेक्यांशी लढत असताना शहीद झालेले पंढरपुरातील मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी यांचा प्रथम स्मृतीदिन पंढरपूर भाजपाच्या वतीने स्वाभिमान दिन म्हणून पाळला जाणार असून त्यानिमित्ताने बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी पंढरपुरातून भव्य स्वाभिमान रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे शहर सरचिटणीस संजय वाईकर यांनी दिली.
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी सीमेवर पाक दहशतवाद्यांशी सामना करत असताना पंढरपूरचे सुपूत्र कुणाल गोसावी हे रणांगणावरच धारातीर्थ पडले. त्यांनी राष्ट्रासाठी आपले बलिदान दिले. या वीराच्या स्मृती पंढरपूरकरांमध्ये आजही जागृत आहेत. शहीद कुणाल गोसावी यांच्या या स्मृतीदिनानिमित्त पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने बुधवार दि. 29 रोजी सकाळी 7.30 वा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापासून स्वाभिमान रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीमध्ये पंढरपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण विद्यालये तसेच माता, बंधू-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
ही स्वाभिमान रॅली सावरकरांच्या पुतळ्यापासून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच गोपाळकृष्ण मंदिर व प्रदक्षिणा मार्गाने निघून या रॅलीची सांगता गोपाळकृष्ण मंदिराजवळ होणार आहे. या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या शामियानामध्ये शहीद कुणाल गोसावी यांच्या स्मृती जागृत केल्या जाणार असून वीरपत्नी उमा गोसावी  यांचा यथोचित गौरव पंढरपूर भाजपाच्या वतीने केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व शहीद गोसावी या पंढरपूरच्या वीरपुत्राचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन शहर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी केले आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *