👁 7 Views

राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवादलाची कार्यकारिणी जाहीर



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

प्रतिनिधी/पंढरपूर 
पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली मजबूत फळी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवादलाची  कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुभाष बागल यांनी दिली आहे. 
पंढरपूर येथे मंगळवारी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी इच्छुक पदाधिकाºयांच्या निवडी करण्यात आल्या. 





देशाचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्या आदेशाने राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलासराव चेळेकर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी करण्यात आली असून त्यांना लवकरंच नियुक्तYीपत्र देण्यात येणार असल्याचेही सुभाष बागल यांनी सांगितले.
या नवीन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी सुहास भागवत चव्हाण (बाभुळगांव), तालुका उपाध्यक्षपदी धीरज रमेश भंडारे (करकंब), कल्याण चांगदेव कुसूमडे (बोहाळी), महादेव ज्ञानेश्वर जाधव (गार्डी), बंडु दुर्योधन हजारे (पळशी), सरचिटणीपदी समाधान मारूती नागणे (उपरी), दादासाहेब रामचंद्र ढोले (रांजणी), मंगेश किसन देठे (धोंडेवाडी), खजिनदारपदी दत्तात्रय विष्णू प्रक्षाळे (फुलचिंचोली), प्रसिद्धीप्रमुखपदी नेताजी काका वाघमारे (सुस्ते) अशी कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.

या कार्यकारिणी निवडीचे वेळी पंढरपूर तालुक्याचे पक्षनिरीक्षक तानाजी पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, आप्पासाहेब जाधव, युवराजदादा पाटील, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे अध्यक्ष दिपक वाढदेकर, तालुकाध्यक्ष अॅड. दिपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, किसान सभा अध्यक्ष मारूती जाधव, सेवादलाचे दिलीप भोसले, विद्यार्थी संघटनेचे संकेत ढवळे, डॉ.अमरजीत गोडसे, आण्णासाो. पवार, महादेव पाटील, कृष्णा माळी, गुलाब मुलाणी यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  

संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *