पंढरपूर Live 5 December 2017
पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते स्व. प्रा . उमेशचंद्र खेडकर चांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा ही येत्या १० डिंसेबर रोजी येथील कवठेकर प्रशालेमधे सकाळी दहा वाजलेपासून होणार असल्यांची माहीती स्व. प्र. उमेशरचंद्र खेडकर मित्र परिवारांच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षापासून स्व. प्र. उमेशचंद्र खेडकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यंदा देखिल त्यांच्या स्मृतीना उजाळा देउन नविन वक्ते घडावेत. यासाठी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन चार गटांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामधे पहीली ते दुसरी असा बाल गट आहे. या गटांसाठी कुठल्याही विषयांचे बंधन नाही. इच्छुक स्पर्धेकांस हवा तो विषय विद्यार्थी घेउ शकणार आहे. यासाठी तीन मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आलेले आहे.
यासह दुसरा गट हा इयत्ता तीसरी ते चौथी या गटांसाठी आहे. याकरिंता माझी आई , माझे आवडते शिक्षक आणि आज शिवबा असते तर… असे तीन विषय देण्यात आलेले आहेत. यासाठी चार मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे.
याशिवाय इयत्ता पाचवी ते सातवी या गटांसाठी स्वप्नातील मी आणि माझा भारत , पाउसच संपावर गेला तर… , असे असावे शिक्षण , विद्यार्थ्याचे आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर असे विषय देण्यात आले असून. याकरिंता पाच मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.
तसेच माध्यमिक विभागातील वरिष्ठ इयत्ता आठवी ते दहावी गटांसाठी स्वच्छ भारत की अस्वच्छ भारत , खरचं , फटाकेमुक्त दिवाळी होईल का ? , माझी प्रेरणा – शहीद मेजर कुणाल गोसावी , प्रसारमाध्यमे शाप कि वरदान असे विषय देण्यात आले आहेत. यासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.
सदरच्या चारही गटांच्या स्पर्धा या १०डिंसेबर रोजी सकाळी दहा वाजलेपासून येथील कवठेकर प्रशालेमधे होणार आहेत. स्पर्धा संपल्यावर लगेचच पारितोषिक वितरणाचा देखिल कार्यक्रम होणार आहे. यामधे विद्यार्थ्याना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देउन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असणार आहे. याकरिंता विद्यार्थ्यानी दिपक इरकल ९४०३२९३२९१ , शशिकांत कराळे ९७६३३८८३११ आणि सोमनाथ गायकवाड ८८०५६२९०४६ , संकेत कुलकर्णी ९९७०१६११०१ या क्रमांकावर नोंदणी करावी. असे आवाहन गणेश धांडोरे आणि प्रशांत वांगीकर , राजेश शहा यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






