👁 10 Views

डॉ.संतोष मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चार हजार अपंग,अंध व विधवांच्या उपस्थितीत भव्य खिचडी वाटो आंदोलन यशस्वी

पंढरपूर Live 6 December 2017

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- अपंग, अंध व विधवांच्या मागण्यासांठी दि.05 डिसेंबर रोजी परळी तहसिल कार्यालयात राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपंगाचे कैवारी  तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 4  हजार अपंग,अंध व विधवांच्या उपस्थितीत भव्य खिचडी वाटो आंदोलन यशस्वी संपन्न झाले.
या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या, अपंग व विधवांना 2 रू किलो गहु व 3 रू किलो तांदुळ असे दरमहा किलो अन्न अंत्योदय योजने मार्फत देण्यात यावे.दरमहा 1000/- रू.संजय गांधी निराधार पगार सुरु करावा.अपंग विधवा यांना ताबडतोब रेशन कार्ड द्यावे. अपंग विमा योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे मोफत द्यावीत. 3% अपंग निधी व घरकुल देण्यात यावे, तालुक्यामध्ये अपंग समिती स्थान करावी. अपंग व विधवांची तहसिल मधील होणारी हेळसांड थांबवावी, अपंगाचे आधार कार्ड मोफत काढुन द्यावेत. अपंगासाठी तहसिलमध्ये वेगळी खिडकी देण्यात यावी. अपंगाचे प्रमाणपत्र परळी उपजिल्हा रुग्णालयातुन देण्यास चालु करावे. अपंगाच्या नोंदी जनगणनेप्रमाणे त्वरीत कराव्यात.तहसील कार्यालय स्तरावर संजय गांधी निराधार योजनेतील अपंगाचे प्रकरणे त्वरीत मंजूर करावी.पंचायत समिती स्तरावर पंचायत समितीचा तीन टक्के अपंग निधी त्वरीत खचर करावा, अपंगाच्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयाने घेण्याचा आदेश मिळावा, तीन टक्के निधी खर्च न करणार्या ग्रामपंचायतीनवर कार्यवाही करावी, ग्रामपंचायतींनी अपंगाना व्यवसायासाठी गाळे व जागा उपलब्ध करावी.नगर पंचायत व नगर परिषद स्तरावर अपगांचा तीन टक्के निधी खर्च करावा, अपंगांना व्यवसायासाठी मोक्याच्या ठिकाणी गाळे व जागा उपलब्ध करून द्याव्यात, नगरपरिषदेने अपंग कल्याण पुनर्वसन समितीची स्थापना करावी. या मागण्यासांठी नायब तहसीलदार महादेव सुरवसे यांना खिचडी देऊन  व तहसीलदार शरद झाडगे यांना निवेदन दिले, त्यांनी लेखी स्वरुपात मागण्या मान्य केल्या.  जि.प.सदस्य अजय मुंडे यांनी सरकारच्या भुमीकेवर ताशेरेवोढुन अपंगाच्या मागण्यासाठीच्या आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला. 
या आंदोलनास जि.प.सदस्य मधुकर आघाव, न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, बीड जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,  पं.स.सदस्य वसंत तिडके, नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते, प्रदिप खाडे, बाशीदभाई, अनंत इंगळे, अ‍ॅड.प्रकाश मुंडे, अ‍ॅड.मंजीत सुगरे, के.डी.उपाडे,ह.भ.प.वासुदेव महाराज मुंडे, सचिन मुंडे, शितलदास आरसुळे, सरपंच पद्माकर शिंंदे, महेबुब कुरेशी, महेंद्र रोडे, लालाखाँ पठाण, शकील कच्छी, नगरसेवक किशोर पारधे, जमिलभाई, दिनेश गजमल, रंगनाथ सावजी, छावाचे बाजीराव काळे, अतुल सायकर, जयदत्त नरवटे, माऊली साबळै, श्रीकृष्ण चव्हाण, वचिष्ठ मुसळे,  राजाभाऊ राडकर, वामनराव माने, गफार काकर, नासरे हुसेन, रवी आघाव यांच्या आदींनी या आंदोनास पाठिंबा दिला.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सय्यद सुभान, साजन लोहिया, अनंतराव लोखंडे, अनंतबापु मुंडे, संतोष आघाव, दत्तात्रय कराड, वैजनाथ थिटे, वैजनाथ थोंटे, रंजित रायभोळे, धनराज कराड, मयुर शिंदे, निवृत्ती मुंडे, अनुसया ताटे, वाघमारे सर, सुधीर निश्चळ, शिवाजी चाटे, दत्ता काटे, सदाधिव शिंदे, सुभाष लोंढे, विजय पवार, उध्दव फड, केशव फड, अनंत सौंदळे, शेख फिरोज, संजय नखाते, शेख कादर, राजकुमार प्रधान, पालीवार मॅडम, सरताज खान, द्रोपती साळवे, सुमन साळवे, संजय घोबाळे, रुपेश चौधरी, शेख चाँद, जयश्री गुंडेवार, दत्त भाटे, विमल सुत्रावे, आसेफ पठाण, राधाबाई सोळंके, सय्यद महेबुब, युनुस डिघोळकर, संदेश भापसे, रामेश्वर जाधव, माणिक जाधव आंदीनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले.  या आंदोलनात परळी तालुक्यातील 4  हजार अपंग,अंध व विधवा बंधु-भगिंनीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *