पंढरपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्द उपनगरातील सर्व रस्ते
डांबरीकरण करणार – आमदार प्रशांतराव परिचारक
पंढरपूर शहरातील प्रभाग क्र.१४ मधील ९०लाख रुपयाचे खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष सुजाता बडवे, प्रभागाचे नगरसेवक व पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक नारायण शिंगण,मुख्याधिकारी अभिजीत बापट, सौ. अर्चना रानगट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, जेष्ट नागरिक आप्पासाहेब वांगीकर,माजी नगरसेवक नागेश शिंगण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शहरामध्ये ५२ कोटीची रस्त्याची कामे हाती घेण्यात आली असून सदर कामे प्रगती पथावर आहेत. तसेच वसंतनगर व स्वा.सावकरनगर या भागात सुमारे ९० लाख खर्चाचे रस्त्याचे कामे खडीकरण व डांबरीकरण कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच भविष्यातील उपनगरतील वाढती लोकवस्ती विचारात घेता प्रशांतराव परिचारक नगर या भागातील नागरिकाच्या सोईसाठी पाण्याची टाकी उभी करण्यात आली होती. त्यामुळे या भागात आज पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून सध्या दुस-या मजल्यावर पाणी मिळत आहे. तसेच उपनगरातील असलेल्या अन्य अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्द असल्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले. तसेच इसबावी येथील सह्याद्री नगर व बिडारी बंगाला दातेमंगल कार्यालय समोर या भागात राहत असलेल्या नागरिकाचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मिटावा म्हणून या ठिकाणी १० लाख लिटरची व इसबावी येथे ५ लाख लिटरची पाण्याची टाकी उभा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पक्षनेते अनिल अंभगराव, पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, विशाल मलपे, विवेक परदेशी, महादेव भालेराव, महादेव धोत्रे, माजी पक्षनेते सचिन डांगे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरअभियंता दिनेश शास्त्री, कनिष्ठ अभियंता मुकुंद जोशी, पत्रकार महेश खिस्ते,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, सचिन शिंदे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग घंटी, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके, चंद्रकांत मोरे, नंदु पेशवे, आण्णा ऐतवाडकर, इब्राहिम बोहरी,सचिन कुलकर्णी,भगत,कोळी,बडवे,बोराडे, अंष्युमन पवार,डॉ.रेवण पाटील,सुरेश ढाणे, पाटील सर, शितोळे सर, बाजारे,सचिन पवार,रफिक तांबोळी,लांडगे सर,नंदु काळे हे उपस्थित होते यावेळी या भागातील काही लोकांना रस्ता लहान असल्याने अडचण निर्माण होत होती. या भागातील नागरिक चंद्रकांत मोरे व धोंडिबा पवार यांनी स्वताची असलेली जागा, लोकांची रस्त्याची सोई व्हावी म्हणून विनामुल्य जागा दिली म्हणुन आमदार प्रशातराव परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व सुत्रसंचलन गणेश शिंगण यांनी केले.आभार नगरसेवक नारायण शिंगण यांनी केले. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






