Pandharpur : कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

Pandharpur : कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

Loading

 

 

Pandharpur Live News : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील दोन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील दोन व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील पाच  विद्यार्थ्यांची असे एकूण नऊ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली. 

पुणे येथील अमेरिकन अँक्सल अँड मॅन्युफॅक्चरिंग या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सूरज गायकवाड आणि निकिता सिरसाळे हया विद्यार्थ्याची निवड केली आहे. तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील रिशा वळसंगे या विद्यार्थिनींची टीसीएस या कंपनी मध्ये तर पंकज जाधव याची आरएसएल सोल्यूशन या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील प्रसाद कुलकर्णी, सागर जानकर, सुनील शेळके, संतोष वाघमोडे, गोपाल बोईनवाड या विद्यार्थ्यांची मेटा इंजिटेक या नामांकित कंपनी मधे निवड झाली आहे. सर्व कंपन्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या आहेत. दर वर्षी प्रमाणेच कर्मयोगीने या ही वर्षी प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून सांगतात. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी,  विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच ट्रैनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय चौगुले, प्रा. व्ही एल जगताप,  प्रा. योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *