Pandharpur Live News: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज मोहोळ तालुक्यात झंझावाती गावभेट दौरा केला. यावेळी ग्रामस्थांचे प्रश्न जाणुन घेता त्यांनी ही निवडणूक लोकशाहीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची असुन सर्वसामान्य जनतेनं आपला स्वाभिमान व संविधानिक अधिकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचं आवाहन केले.
डिकळस गावाला भेट
गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आज डिकसळ गावाला भेट दिली. भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंयं. खताचे भाव वाढवले. कांद्याला हमी भाव मिळत नाही. ऐन मोक्याच्या वेळी कांदा निर्यात बंद केली जाते. आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. दूधाला भाव नाही. शेतकरी जगणार कसा, याची भाजपला चिंता नाही. ते फक्त सत्तेसाठी आश्वासन देतात, खोट बोलतात. यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी यावेळी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी बोलताना केलं. या प्रसंगी महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाळुज गावाला भेट
मोहोळ तालुक्याच्या गाव भेट दौऱ्यात आज वाळूज गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उस्फुर्त स्वागत केलंं. सोलापुरच्या विकासासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपली लेक खंबीर आहे. मला आपली सेवा करण्याची संधी द्या. भाजपने मागील १० वर्षात सोलापुरला विकासापासून वंचित ठेवलं. या भाजपला सत्तेतून खाली खेचणं आवश्यक आहे. यावेळेस काँग्रेसला प्रचंड मतानं विजयी करा, असे आवाहन बोलताना केलं. महाविकास आघाडीला खेडोपाड्यातून, गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यावरून विजयाची खात्री पटते. या प्रसंगी महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देगाव गावभेट
गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आज देगाव येथील नागरिकांची भेट घेतली. देगांवच्या रहिवाश्यांनी मोठ्या उत्साहात स्वागतं केलं. मागील १० वर्षात भाजपच्या सरकारनं फक्त आश्वासनं दिली. विकासकामे केली नाहीत. आज महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्य जनता महागाईमुळं होरपळून निघाली आहे. भाजपला सत्तेतून हटवणं गरजेचं आहे. यामुळं काँग्रेसला मतदान करून प्रचंड विजयी मतानं विजयी करा. आम्ही आपल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे याप्रसंगी बोलताना सांगितलं. यावेळी महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.