Pandharpur: कर्मयोगी मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न ; माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Loading

Pandharpur Live: महाविद्यालयात  असताना केलेली मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, क्रीडा स्पर्धा,  स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.

२०१२ ते २०२३ या जवळपास ११ वर्षांत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कर्मयोगी मधे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. 

कर्मयोगीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागाने दि. १३ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये सुमारे ५० हून अधिक माजी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्रीतम वठारे व निशा अंध यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा. एस एम लंबे यांनी कॉलेजचा व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनियरिंग विभागाच्या प्रगतीचा आढावा माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला. कर्मयोगीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनियरिंग विभागातून शिक्षण पूर्ण केलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थ्यानी परदेशामद्धे यशस्वी अभियंते म्हणून नावलौकिक मिळविला आहे. तसेच अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजग म्हणून कार्यरत आहेत. अश्या सर्व विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात,  विभागप्रमुख प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. आशिष जोशी यांनी संयोजक म्हणुन काम पाहिले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती जाधव व अथर्व रोकडे  यांनी केले. विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यानी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *