👁 7 Views

आरोग्य सेवा पुरविण्यास सामाजिक संस्थांनी पुढे यावे पालकमंत्री विजय देशमुख यांचे आवाहन

पंढरपूर LIVE 11 ऑक्टोबर 2018

      सोलापूर  दि. 11 :-  गरीब व सामान्य रुग्णांसाठी शासनामार्फत आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शासनाबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज केले.
      श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व पी. पी. पटेल फौंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हील हॉस्पिटल येथे गरीब रुग्णांना मोफत डायलेसिस उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आणि विसावा प्रतिक्षालय कक्षाचे भूमिपूजन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनिल घाटे, वैद्यकीय अधिक्षक सतिश मेश्राम, डॉ. प्रसाद,  डॉ. राजशेखर येळेगावकर, पी. पी. पटेल फौंडेशनचे अध्यक्ष विजय पटेल, जयेश पटेल, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
      श्री. देशमुख म्हणाले, ‘आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. शासन आरोग्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देते. जिल्ह्यातील गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आता सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. शासनाच्या उपक्रमात सामाजिक संस्थांचा पुढाकार, सक्रीय सहभाग मिळाल्यास जिल्ह्यातील जनतेला मुबलक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. पी. पी. फौंडेशने गरीब रुग्णांसाठी डायलेसिस खर्च उचलून सामाजिक उत्तरदायित्व जोपासले आहे. त्यांचा हा वसा इतर संस्थांनाही अनुकरणीय आहे.
      श्री. देशमुख म्हणाले, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास लवकरच शासनामार्फत पाच  डायलेसिस मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे गरीब रुग्णांना डायलेसिस सारखी महागडी सेवा रुग्णांना अल्पदरात मिळणार आहे. परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून पी. पी. फौंडेशनचा विसावा प्रतिक्षालय कक्षाचे होणारे काम स्तुत्य उपक्रम आहे. या कक्षात रुग्णांच्या नातेवाईकांच्या विसाव्याची सोय होणार आहे.
      डॉ. घाटे म्हणाले, रुग्णालयात येणाऱ्या गरीब व वंचित रुग्णांना दिलासा देण्याचे काम रुग्णालयामार्फत होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकासाठी विसावा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. गरीब रुग्णांच्या डायलेसिससाठी पी. पी. पटेल फौंडेशने खर्च उचलला ही त्यांची गरीब रुग्णांप्रती असणारी अस्मिताच दर्शविते. यावेळी पी. पी. पटेल फौंडेशनचे जयेशभाई पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *