पंढरपूर LIVE 12 ऑक्टोबर 2018
डिप्लोमा इंजिनिअरींगमध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय विद्यार्थ्यांचे स्वागत
पंढरपूर-विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टीत आवड आहे ती केलीच पाहिजे परंतु ज्या गोष्टीत आवड नाही त्यात आवड निर्माण करण्याची मानसिकता निर्माण केली पाहीजे. त्यामुळे साहजिकच आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला जातो. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग राबविताना विविध प्रकारे अभ्यास करून त्या विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल याकडे अधिक लक्ष दिले जाते. दहावीला ५८ टक्के गुण मिळविलेल्या सुदर्शन मकर या विद्यार्थ्याने डिप्लोमाच्या पहिल्या वर्षातील पहिल्या सत्रात ८२ टक्के तर दुसऱ्या सत्रामध्ये ९३ टक्के गुण प्राप्त करतो. असाच चढता आलेख प्रत्येक विद्यार्थ्याचा यावा यासाठी स्वेरीमध्ये विशेष प्रयत्न केले जातात. म्हणूनच पालकांचा विश्वास हाच स्वेरीच्या यशाचा पाया आहे.’असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक- सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित डिप्लोमा इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमाच्या प्रथम वर्षातील व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत सत्काराचे आयोजन केले होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व स्वेरीचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे बोलत होते. दिपप्रज्वलनानंतर प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी स्वागत समारंभ आयोजिण्याचा हेतू सांगून डिप्लोमा इंजिनिअरींगची आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली. तसेच प्रथम वर्षातील सर्वच्या सर्व जागा भरून राज्यात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वेरी डिप्लोमाने प्रथम स्थान पटकाविल्याबद्धल सर्व पालकांनी प्राचार्य डॉ. मिसाळ यांच्यासह प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन केले. पालक प्रतिनिधी म्हणून बोलतांना मुंबईचे सुरेश केवळे म्हणाले की, ‘मुंबईमध्ये यापेक्षाही मोठमोठ्या महाविद्यालय आहेत परंतु याप्रमाणे शिक्षण आता तिथे मिळणे अवघड झाले आहे. याठिकाणी सुंदर नियोजनाबरोबरच प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना दिले जाणारे वैयक्तीक लक्ष यामुळे पाल्यांची विशेष प्रगती होत आहे. ही स्थिती मोठमोठ्या शहरात दिसत नाही. त्यामुळे आमच्या पाल्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी स्वेरीमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.त्यामुळे पाल्यांची प्रगती निश्चित होणार याचा विश्वास वाटतो.’ महिला पालक प्रतिनिधी सौ. सुवर्णा गायकवाड म्हणाल्या की, ‘येथील शिक्षण पद्धती आणि शिस्तीचे वातावरण यामुळे मुलांना अभ्यासाशिवाय अन्य गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. संपूर्ण वेळेचे नियोजन आणि सोय केल्यामुळे आम्ही पालकवर्ग निश्चिंत आहोत. ‘पुढे बोलताना सचिव डॉ. रोंगे म्हणाले की, ‘आता आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर असताना अवघड विषयाचा बाऊ न करता सहजतेने हाताळले पाहिजे. त्यासाठी सर्व विषयांना समान वेळ देत असताना अवघड वाटणाऱ्या विषयाकडे जास्त वेळ दिला तर तो विषय अवघड वाटणार नाही. यासाठी काय आवडते ? यापेक्षा आपण स्थिरस्थावर होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. शिस्त आणि आदरयुक्त संस्कार याच्या जोडीला आपला भक्कम विश्वास यामुळे करिअर करताना अडचण येत नाही.’ यावेळी संजय पाठक, सौ माधुरी चिकणे, सुरेश कवाडे, रामकृष्ण गुरव, डॉ. विवेक पवार, नीलकंठ शेते, सचिन कुलकर्णी, नाईकनवरे या पालकांनी काही स्वागतार्ह सूचना केल्या. सर्वं सूचना, गाऱ्हाणी यावर सचिव डॉ. रोंगे यांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडविले तर काही पालकांनी स्वेरीमध्येच अकरावी व बारावी सायन्स सुरु करण्याची मागणी देखील केली. काही पालकांनी वसतिगृह आणखी वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर काहींनी असलेल्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गणित विषयात राज्यात प्रथम आलेल्या १३ विद्यार्थ्यांची, परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.पी.एस.कचरे,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व प्रथम वर्ष प्रवेश घेतलेले विद्यार्थी व पालक असे मिळून सुमारे १५०० जण उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. सुनिल भिंगारे यांनी केले तर वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम. पवार यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






