👁 9 Views

मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या… शेतकरी गाव गहाण ठेवणार !

पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018


मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यात ०५ वर्षात १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत असे सेवाग्राम संघटनेने दावा केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्जमाफीचे पॅकेज जाहीर केले पण ही तुष्ट्पुंजी मदत ही कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने सरकारचा निषेध करत उस्मानाबाद जिल्हातील उमरगा तालुक्यातील कवठा ग्रामसभेने शेतजमीन आणि आपली घरे गहाण ठेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी जमिनींचे व आपल्या घराचे ७/१२ व गहाण खत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करणार असल्याचे शेतकरी विनायक पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर १६ ऑक्टोबर रोजी अख्ख गाव मंत्रालय समोर रस्ता रोको करून सरकारचा निषेध करणार आहे, असे सांगितले. गेली ०४ महिने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या या फसवणुकीच्या संदर्भात लातूर किल्लारी येथे आमरण उपोषण सुरु केले असता जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले कि, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ ? पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप भेट व आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचा हमीभावाचा तपशील तयार केला होता. शेतमाला सरकारने जाहीर केलेला हमीभाव भात, ज्वारी, सोयाबीन, उडीद, कापूस, मुग यांचा जो हमीभाव आहे तो कमी आहे. आणि कृषी विद्यापीठाने काढलेला उत्पादन अधिक आहे. अर्थात यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळाले पाहिजे तो मिळत नाही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार ला कंटाळून शेतकरी चक्क गावच गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *