👁 8 Views

पाथरी तालुक्यातील माजी सैनिक तारूगव्हाण चे सुपुत्र रावसाहेब पौळ-पाटील (आण्णा) यांचे दुःखद निधन… पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांच्या परिवारातला जुन्या पिढीतील देदीप्यमान दुवा निखळला…

पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018


जुन्या पिढीतील धुरंधर सैनिक व परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण या गावचे सुपूत्र, माजी सैनिक  म प्रयागमाई वानखेडे शैक्षणिक संस्था पाथरी चे संस्थापक अध्यक्ष  रावसाहेब पौळ-पाटील (आण्णा) (85) यांचे आज दि. 30-10-2018  रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.
पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान गणपतराव वानखेडे यांच्या आत्याचे पती व त्यांच्या मुळगाव तारूगव्हाण येथील प्रतिष्ठित असलेले माजी सैनिक रावसाहेब पौळ पाटील यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी तारूगव्हाण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी नातवंडे, सुना असा परिवार आहे.
तारूगव्हाण या छोट्याशा गावात जन्मलेले रावसाहेब (आण्णा) पौळ पाटील यांनी खडतर परिश्रम घेवुन स्वतःची अनंत, उदय, चंद्रकांत ही मुलं उच्चशिक्षित बनवली. आज ही तिन्ही मुलं गावचे नाव महाराष्ट्रात शैक्षणिक, न्यायालय आदी क्षेत्रात उज्ज्वल करत आहेत.
तारूगव्हाण या गावाला विकासाची नवी दिशा दाखविणारा दुवा आज निखळला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
पंढरपूर लाईव्ह परिवार व वानखेडे परिवाराकडून आण्णांच्या चिरंतन पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *