👁 5 Views

पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरींग अभियंत्यांची बांधकामास भेट

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सावरकर नगर (ता.पंढरपूर) येथील आर सी सी  रेसिडेंट बांधकामास  महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षातील अभियंत्यांनी भेट देऊन माहिती घेतली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.


 सिंहगड महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम साहित्य आणि  कामाचे स्वरूप हे पाहण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी बांधकाम करीत असताना अभियंत्यांनी कोण-कोणती बांधकाम साहित्य आवश्यक आहे. 


याबद्दल महत्वपूर्ण माहिती घेतली. कामावरील मजुर व बांधकामाचे साहित्य यांची काळजी कशी घ्यावी? याशिवाय ते कसे हाताळायचे यासंदर्भात माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. आधुनिक यंञ व साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षणाबरोबर प्रत्यक्षातील बिल्डिंग बांधकाम संबंधित व्यावहारिक ज्ञान, अनुभव व मूलभूत संकल्पना वाढण्यासाठी ही भेट खूप उपयुक्त ठरली.


    महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भेटीसाठी प्रा. अजित करांडे, प्रा. गणेश लकडे आणि प्रा. शेखर पाटील सह सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *