👁 10 Views

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपी वाढवून देण्यासंदर्भात राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा; साखरेचे दर ही 2900 ऐवजी 3400 रु. करणंही अत्यावश्यक – कल्याणराव काळे

पंढरपूर LIVE 8 नोव्हेंबर 2018

साखर कारखाने कर्जबाजारी झाले आहेत. बँका पैसे देत नसल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना एफआरपी वाढवून देण्यास आम्ही सक्षम नाही. राज्य सरकारनेच यासंदर्भात बँक प्रतिनिधी, सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करुन यावर तोडगा काढायला हवा. तसेच शासनाने साखरेचा एमआरपी दर 2900 ऐवजी 3400 रु. करणंही अत्यावश्यक असल्याचं मत सहकारशिरोमणी सह. साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केलं. 
 साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 9.5 रिकव्हरी बेस प्लस शासनाने वाढविलेले 200 अधिक 1% 289 याप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर विविध साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे.  आज दि. 8 नोव्हेंबर 2018 रोजी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरासमोर हे आंदोलन झाले. यावेळी श्री.काळे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. साखर कारखानदारीसमोरच्या अडचणी सांगितल्या. बँक प्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी व सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन या सर्वांची बैठक बोलावुन यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घेणं आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, उपजिल्हाध्यक्ष निवास भोसले, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णू बागल,  तालुका अध्यक्ष नवनाथ माने, युवा आघाडी शहर अध्यक्ष अतुल करंडे,  जिल्हा  संघटक  विजय रणदिवे,  मेजर नागटिळक, विश्रांतीताई भुसनर, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *