👁 7 Views

महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण….

अमित गजानन वानरे (वय 32 रा. किवळे) व सुलतान युसुफ खान (वय 27 रा. देहुरोड) अशी अटक आरोपींची नावे असून पीडित महिलेने याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या त्यांच्या  पतीला शोधण्यासाठी जात असताना आरोपीने महिलेला हटकले व अश्लिल शेरेबाजी केली.


 यावेळी फिर्यादीचे पती तेथे आले व त्यांनी जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली, पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन आपटून त्याचे नुकसान केले. व शिवीगाळ केली.


 यावरून देहुरोड पोलिसानी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *