👁 10 Views

पत्रकार संरक्षण समितीच्या मुंबई अध्यक्षपदी प्रकाश संकपाळ यांची निवड

पंढरपूर LIVE 14 नोव्हेंबर 2018



मुंबई – “ना जातीसाठी , ना मातीसाठी ” लढाई फक्त पञकारांच्या न्याय व हक्कासाठी..हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करणाऱ्या ‘पत्रकार संरक्षण समिती’ ने मुंबई अध्यक्षपदाची धुरा प्रकाश संकपाळ यांच्या खांद्यावर सोपविली आहे.


प्रकाश संकपाळ हे गेली ३० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ या वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या पत्रकारितेस सुरुवात केली.त्यानंतर दैनिक नवाकाळ, सामना,सत्यवार्ता जनमत,पोलीस टाईम्स अशा विविध वृत्तपत्रातून त्यांनी विपुल लिखाण केले आहे.


मात्र गेली अनेक वर्षे त्यांची नाळ दैनिक ‘सत्यवार्ता’ शी जुळली गेल्याने सहसंपादक या पदावर काम करीत आहेत.



संकपाळ हे शासनाच्या विविध अशासकीय समितीवर सदस्य आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजीक संघटनांनी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे तसेच त्यांचे पत्रकारितेतील योगदान लक्षात घेऊन ‘पत्रकार संरक्षण समिती’ चे  राज्य अध्यक्ष विनोद पत्रे यांनी त्यांची मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *