पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018
‘विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असूनही, स्पर्धा परीक्षेला पात्र असतानाही केवळ मार्गदर्शनाअभावी परीक्षेचे महत्व ओळखु न शकल्यामुळे ते शासकिय सेवेपासून वंचित राहतात. हाच मुख्य धागा पकडून सायन्स शाखेतील अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपले भवितव्य उज्वल करण्याची संधी‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या माध्यमातून स्वेरीने प्राप्त करुन दिली. विषेशतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अभियात्रिकी तंत्रज्ञान विषयाचे ज्ञान फारसे अवगत नसते,यासाठी त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची माहीती व्हावी, तसेच तंत्रविषयांमध्ये आवड निर्माण व्हावी. या दृष्टीने दि.१४,१५ व १६ सप्टेंबर या तीन दिवशी‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’हे तंत्र प्रदर्शन खुले करण्यात आले होते. या प्रदर्शनात उडते रोबोट चालविणे कॉम्प्यूटरवर विविध अॅनिमेशन बनविणे, छोटे इलेक्ट्रॉनिक सर्किट बनविणे,लेसर प्रिंटर व थ्रीडी प्रिंटींगद्वारे डिझाईन बनविणे इ.प्रात्यक्षिक मुलांना करुन पाहता आले. महाविद्यालयातील संशोधनासंबंधीत प्रयोगशाळाही पहावयास मिळाले. मेकॅनिकल विभागातून रोबो रेस,लेथवार,एरो मॉडेलिंग,कास्ट स्टिल वॉर, अॅटो कॅड रेस, कटीया रेस, टेक्नो मेक वॉर, सिव्हिल विभागात फॅब्रिका, ब्रीज डिझाईन,कॅड रेस, सर्वे हंट. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातून सर्कीट सुडोको, प्रात्यक्षीक, रोबोट्रीक्स,कॉमन इव्हेंटस्मध्ये ट्रेल ब्लेझर, पिकासा, विझो-ओ-टेक,डॉक्युमेंट्री,कॅट- मॅट अॅबिलिटी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागातून अॅनिमेशन,एन. एफ. एस.,काऊंटर स्ट्राईक, कोड डिबगींग आदी विषयक माहिती मिळाली. यावर प्रात्यक्षिकाची माहिती देखील मिळाली. तसेच भविष्यात अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा झाला तर लागणाऱ्या आवश्यक बाबी, त्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा, वसतिगृह व्यवस्था असे आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वेरीतील शिस्तबद्ध विद्यार्थी, संशोधनासाठी उपयुक्त वातावरण मिळणारे ज्ञान यामुळे विद्यार्थी प्रचंड उत्साहीत झाले.
सलग तीन दिवस चाललेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनात जवळपास ३२ महाविद्यालयातील जवळपास चौदाशे विद्यार्थ्यांनी व ऐंशी शिक्षकांनी याचा लाभ घेतला. या भव्य व दिव्य प्रदर्शनातील मिळालेल्या माहितीमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी व उज्वल यश मिळणार भविष्य घडविण्याची संधी व योग्य दिशा मिळाली.’असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’उपक्रमामुळे विद्यार्थी उत्साहीत झाल्याचे दिसून येत होते. हे तीन दिवसीय ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ प्रदर्शन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रम समन्वयक प्रा. धनंजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com