पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018
पंढरपूर, दि.17- राज्याच्या विविध भागातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक श्री.विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येतात. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येणाऱ्या भाविकांना विठ्ठल मंदिरा बाबत तसेच शहरातील आवश्यक ठिकाणाची माहिती तात्काळ मिळावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत तीर्थक्षेत्र पोलीसींग संकल्पना राबविण्यात आली आहे. असे जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र पोलीसिंग कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील व प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलीस निरिक्षक राजेश गवळी, पोलीस निरिक्षक श्री.खारतोडे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, स्वेरी कॉलजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील बोलताना म्हणाले, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात भाविक पंढरपूर येथे येतात. येणाऱ्या भाविकांबरोबरच शहरातील नागराकांची सुरक्षितेतची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. यात्राकालावधीत वाहतुक व्यवस्थेवर व सुरक्षेवर अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी भाविकांच्या मदतीसाठी तीर्थक्षेत्र पोलींसींग केंद्र माहिती व सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र शहरातील अंबाबाई पटांगण, नवीन एस.टी. बसस्थानक, शिवाजी चौक व सांगोला चौक येथे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रामधून विठ्ठल मंदीरासह शहरातील मठ, धर्मशाळा, आरोग्यसेवा तसेच महत्वाच्या ठिकाणची माहिती दिली जाणार असल्याचेही जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रांतधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले बोलताना म्हणाले, श्री.विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ या चार यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणात येतात तसेच दररोज मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत येत असतात. येणाऱ्या भाविकांना विठ्ठला मंदिरा व्यतिरिक्त इतर आवश्यक माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत तीर्थक्षेत्र पोलिसींग केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्राना मंदीर समितीमार्फत आवश्यक सहकार्य करेल तसेच केंद्रास तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे म्हणाले पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना आवश्यक माहिती मिळाली नाही तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी तीर्थक्षेत्र पोलिसींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. भाविकांना आवश्यक असणारी सर्व माहिती या केंद्रामध्ये मिळणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी या संकल्पनेला सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी केले. यावेळी मान्यवर नागरीक, पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com