👁 9 Views

पंढरपुरातील मद्यविक्री दुकाने रविवार,सोमवारी बंद

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018

सोलापूर, दि. १७ – कार्तिकी एकादशीच्या पार्श्र्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने उद्या , रविवार, १८ आणि सोमवार , १९ नोव्हेंबर २०१८ रोजी बंद राहणार आहेत.
            जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी १८ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री  बंद ठेवण्याचे आदेश १४ नोंव्हेंबर रोजीच जारी केले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र विदेशी मद्य विक्री नियम १९६९ नुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात १८ आणि १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मद्यविक्री बंद राहिल.
            डॉ. भोसले यांनी सांगितले की , कार्तिकी एकादशीच्या पार्श्र्वभूमीवर पंढरपुरात लाखो वारकरी येतात. वारीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मद्यविक्री बंदीचे आदेश १४ नोव्हेंबर रोजी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर  महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९६९ मधील नियम ९ अनुसार राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), ३० जानेवारी (हुतात्मा दिन), एक मे (महाराष्ट्र दिन), आषाढी एकादशी, १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), अनंत चतुर्दशी, महात्मा गांधी सप्ताहानिमित्त दोन ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबर आणि कार्तिकी एकादशी दिवशी बंद ठेवली जातात.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *