👁 7 Views

भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस महादेव खिलारे यांचे आमरण उपोषण.. पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी!

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018

भाजपा किसान आघाडीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस महादेव वसंत खिलारे यांनी दि. 26 डिसेंबरपासून पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील दारु, मटका, जुगार, गांजा, तसेच प्रतिबंधात्मक मावा, गुटखा, अवैध खाजगी सावकारी व अवैध वाहतूक, अवैध वाळु उपसा, एसटी स्टॅन्ड व पोलीस स्टेशनच्या समोर अवैध वडाप व रिक्षांची वाहतुक होत असल्याचा आरोप खिलारे यांनी केला आहे. व हे सर्व अवैध धंदे बंद करावेत तसेच या अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व तालुक्यात माफियागिरी व दादागिरी प्रचंड प्रमाणात वाढलेली असून याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी श्री.खिलारे यांनी केली आहे. यासाठी त्यांचे पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे.

आपण मागे ही एकदा या मागणीसाठी आंदोलन केले होते. परंतु मला आश्‍वासन दिल्याने मी हे आंदोलन स्थगीत केले होते. परंतु मला मिळालेले आश्‍वासन हे खोटे निघाले. सर्रासपणे अवैध धंदे व वाळु तस्करी सुरुच आहे. त्यामुळे मी पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. आता ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची माहिती श्री.खिलारे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिलीय. 

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *