पंढरपूर LIVE 29 नोव्हेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील मौजे.तावशी येथील जि.प.प्रा.शाळेतील रिक्त जागी शिक्षक भर्ती करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंढरपूर पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षी सप्टेंबर2017 मध्ये शाळेचा पट 122 होता. सदर शाळेत गेल्या वर्षापर्यंत ‘30 विध्यार्थ्यांना एक शिक्षक’ याप्रमाणे पाच शिक्षकांची नियक्ती होती. परंतु गेल्या वर्षी एका शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्याचा शाळेचा पट गेल्यावर्षी पेक्षा जास्त म्हणजेच 128 असताना चालू सन-2018-19 नुसार सदर जि.प.शाळेला 5 शिक्षक मंजूर व एक जागा रिक्त असताना, सध्या चारच शिक्षक कार्यरत आहेत.त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकांवर पडत आहे. एक तर शासनाकडुन शिक्षकांना मतदार नाव- नोंदणी व इतर शाळाबाह्य कामे नियमितपणे दिली जातात व शाळेची गुणवत्ता, क्रीडाप्रकार, सांस्कृतीक कार्यक्रम, शालेय पोषण-आहार व सर्व प्रकारचा जमा-खर्च अहवाल लिखित स्वरुपात ठेवन्याची आपणच अपेक्षा करतो. त्यामूळे शिक्षकांवरील वाढत्या कामाचा भार कमी व्हावा व शाळेची गुणवत्ता वाढावी म्हणुन जि.प.प्रा.शाळा तावशी येथील रिक्त जागेवरील शिक्षकाची पटसंख्येच्या प्रमाणात नेमणुक त्वरित करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आली होती.
ही मागणी मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालय पंढरपूर समोर गुरुवार दि.29/11/2018 रोजी स.11.00 ते 05.00 वा.पर्यंत एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड सोलापुर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे , शहानुर गवळी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तावशी ग्रामस्थ सहभागी होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








