👁 8 Views

मंदिरातील दानपेटीप्रमाणे शाळेत दिली ज्ञानपेटी..! यथाशक्ती या ज्ञानपेटीत शालेय साहित्य टाकुन गरजु विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन…. तावशी येथील प्रमोद जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम

पंढरपूर LIVE 7 डिसेंबर 2018

प्रतिनिधी:पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जगदाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या मित्र परिवाराने जि.प.प्रा.शाळा तावशी येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमामध्ये त्यांनी एक अभिनव व स्तुत्य असा उपक्रमही राबवला. तो म्हणजे ‘‘मंदिरातील दानपेटीप्रमाणेच शाळेमध्ये ज्ञानपेटी देऊन या ज्ञानपेटीत शाळेला भेट देणार्‍या मान्यवरांनी यथाशक्ती पेन, वही, कंपासपेटी, पुस्तक आदी शालेय साहित्य टाकावे. जेणेकरुन गरजु विद्यार्थ्यांना या ज्ञानपेटीतून आवश्यक ते शालेय साहित्य विनामुल्य घेता येईल.’’ वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अशा प्रकारचा एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल प्रमोद जगदाळे व मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ  तावशी च्या सरपंच सोनालीताई यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयामध्ये पुस्तकांचे वाटप गणेशभाऊ बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना मित्र परिवाराच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. शाळेत खाऊ वाटप करण्यात आले. व परिसरात स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली. 

   
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रमोद जगदाळे यांनी केले. यावेळी रवींद्र भोसले गुरूजी व उपस्थित मान्यवरांनी आपल्ीरया मनोगताद्वारे या उपक्रमाचे कौतुक करुन अशा प्रकारचे उपक्रम सर्वत्र राबले जावेत. अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी डॉ. रविंद्र गायकवाड, ग्रंथपाल नाथा पिसे, गोंधळी मॅडम, बनसोडे गुरूजी, हीरालाल आतार, फिरोज तांबोळी, गणेश बुरांडे, समाधान गाडेकर, सोहेल अतार, जावेद अतार, फिरोज अतार,राहुल चव्हान,प्रविण बुरकुल, महश पावले, शाहिद अतार, सोहम बोडके, संतोष कोळी, आकाश जगदाळे, सुरज अतार, तन्वीर अतार, पालक व मित्रपरिवार बहुसंखेने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *