👁 8 Views

पत्रकारांवर हल्ले करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी! ‘‘कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना पत्रकार संरक्षण समितीची मागणी’’ पंढरपूरचे डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांच्याकडे दिले निवेदन

पंढरपूर LIVE 9 डिसेंबर 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 रोजी सोलापूर येथील ‘लाईव्ह सोलापूर’ चे पत्रकार पत्रकार विजयकुमार बाबर यांच्यावर कांही गुंडांनी भरचौकात, दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला केला. यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पत्रकारांवर अशा प्रकारे हल्ले करणार्‍या गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी आज दि. 9 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिती, सोलापूर जिल्हा यांचे वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे करण्यात आली. पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या द्वारे या मागणीचे निवेदन देण्यात आले. 
गोहत्येस बंदी असतानाही सोलापूर परिसरात अवैधरित्या होत असलेल्या गोहत्येसंदर्भात पत्रकार बाबर यांनी वृत्तमालिका प्रसारीत केली होती. या वृत्तांमुळे कांही ठिकाणी अशा प्रकारे अवैध गोहत्या होत असणार्‍या कत्तलखान्यांवर छापे टाकुन पोलीसांनी कारवाई केली होती. याचा राग मनात धरुन कांही गुंडांनी बाबर यांच्यावर काल दि. 8 डिसेंबर 2018 रोजी प्राणघातक हल्ला केला.  ही बाब गंभीर स्वरुपाची असुन अशा प्रकारे जर पत्रकारांवर हल्ले करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्‍चितच अशा घटना कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरत आहेत. तरी पत्रकार बाबर यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन दोषी आरोपींवर कठोरात कठोर शासन होणेसाठी प्रयत्न करावेत. व पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भातील गुन्ह्यांची नोंद तात्काळ घेतली जाऊन त्याचा तपास जलदगतीने करण्यासंबंधीचे आदेश आपण आपल्या अखत्यारित असलेल्या सर्व पोलीस अधिकार्‍यांना द्यावेत. अशी मागणी आय.जी. विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे.
डीवायएसपी डॉ.सागर कवडे यांना निवेदन देताना पत्रकार अभिराज उबाळे (सह्याद्री दुरदर्शन), जाकीर नदाफ (एस.पी.  न्युज), प्रभु पुजारी (दै. लोकमत), नंदकुमार देशपांडे (ठिणगी), सचिन कांबळे (दै.लोकमत), रामचंद्र सरवदे दै.कृषीवल), दत्ता पाटील (सत्यता), रामकृष्ण बिडकर (पंढरी संदेश), संजय कोकरे (दै.माणदुत एक्सप्रेस), राजेंद्र कोरके-पाटील (दै.अग्रदुत), बाहुबली जैन (दै.जनसत्य), नागनाथ सुतार (एच.पी.एन. मराठी), गणेश महामुनी(एच.पी.एन.मराठी), संतोष रणदिवे(दै.तरुण भारत संवाद) व पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे (पंढरपूर लाईव्ह) आदी उपस्थित होते. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *