पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018
पंढरीत आजपासून देश विदेशातील संशोधक होत आहेत दाखल
पंढरपूर– (संतोष हलकुडे) ‘उद्या शुक्रवार, १४ डिसेंबर आणि शनिवार, १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे आयोजन केले असून भारतातून व भारताबाहेरून येणाऱ्या संशोधक, शास्त्रज्ञाच्या स्वागतासाठी स्वेरी सज्ज झाली असल्याचे दिसून येत आहे तर आजपासून पाहुण्यांचे आगमन होत आहे. या परिषदेसाठी स्वेरीच्या सर्व विभागातील प्राध्यापक आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. ही परिषद संशोधकांना सामाजिक जाणीवेतून तंत्रज्ञान निर्माण करून, तंत्रज्ञानातून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरीत करेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेस भारत सरकारच्या बी.आर.एन.एस., डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थांचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. या परिषदेसाठी मुख्य आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलसह स्वतंत्र सहा सेमिनार हॉल सज्ज आहेत.’
स्वेरीमध्ये होणाऱ्या ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेविषयी मागील आठवड्यात पत्रकार परिषददेखील आयोजिली होती. त्यातून परिषदेची माहिती सर्व पत्रकारांद्वारे जनतेस दिली होती. संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होत आहे. यंदा देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विद्याशाखांना एकाच छताखाली संशोधनाच्या रूपाने समाजोपयोगी उपक्रमासाठी एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य या तंत्र परिषदेद्वारे पार पाडले जाणार आहे. सामाजिक प्रगतीसाठी सुरु असलेल्या संशोधनाला प्रकाशात आणण्याचे काम ही तंत्रज्ञान परिषद करणार आहे. या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाच्या सकारात्मक बदलाच्या संधी विकसित करणे, तंत्रज्ञानाचे सामान्य जनांसाठी प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष ग्रामीण भागात तंत्रज्ञान राबविताना येणाऱ्या अडचणी, स्वेरीच्या ग्रामीण तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करणार्या केंद्राचे मार्गदर्शन संशोधन विकासासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाबरोबर आपल्या संकल्पनांची देवाण घेवाण, संशोधनासाठी आवश्यक निधी मिळणेबाबत सुयोग्य मार्गदर्शन इ. विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे उदघाटन भारताच्या पहिल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राप्ट या विमानाचे मुख्य डिझाईनर पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस ह्या लाभल्या आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून अमेरिकेतील टेक्सास ए. अँण्ड एम. विद्यापीठाचे टिस सेंटरचे डायरेक्टर डॉ. सतीश बुक्कापटणम हे लाभले आहेत. या तसेच बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. झ्लात्का व्हाजारनिस व डॉ. मारिया नेनोवा, इस्त्राईलमधील मुक्त विद्यापीठाचे डॅना हरारी, अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे डॉ. संतोष के.सी., पिठाडीया फौंडेशनचे चेअरमन दिलीप पिठाडीया, जर्मनीचे भारतातील इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक, बेंगलोरमधील आय.आय. एस. सी. चे डॉ. के. राजन्ना व प्रा. जे.एम. चंदरकिशन, बी.ए.आर.सी.चे हेमंत सोड्डे, डॉ. गुलशन रेलहान व डॉ. आर. बालसुब्रमण्यम, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर व डॉ. व्ही.व्ही. महाजनी, डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी,पुणेमधील डॉ. दिनेश सिंग ठाकूर, इंडस्ट्रीयल एक्स्पर्ट बी.एच. श्रीनाथ हे ही मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.
दोन दिवस चालणार्या या परिषदेत देश-विदेशातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये तीनशेहून अधिक शोधनिबंध या परिषदेसाठी संकलित झाले असून हे शोध निबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘स्प्रिंगर’प्रकाशकांकडून पुस्तक स्वरूपात प्रकाशित होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे संस्थेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध वाढतील व संशोधनामध्ये वाढ होवून महाविद्यालयाच्या प्रगतीत महत्वाचे पाऊल ठरेल. या परिषदेदरम्यान विविध नामांकित देशी, परदेशी संस्थांशी सामंजस्य करार होणार असून ते समाजोपयोगी ठरतील. यावर्षीही संशोधकांनी समाजातील विविध प्रश्न तंत्रज्ञानाच्या आधारे सोडविण्याकरिता केलेल्या संशोधनावर शोध निबंध जमा केले आहेत. यामध्ये शेती व ग्रामीण भागाच्या तंत्रज्ञान, आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या मायक्रो नॅनो संशोधन, तसेच सोलार, बायोडिझेल व सॅटेलाईट तंत्र ज्ञानावर आधारित लक्षवेधी ठरतील असे शोध निबंध जमा झाले असल्याची माहिती तंत्र परिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी दिली.
पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्थरावर संशोधन क्षेत्रात वातावरण आणखी बहरणार आहे आणि याला निमित्त आहे, स्वेरीत होऊ घातलेली दुसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद ‘टेक्नोसोसायटल–२०१८’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय संशोधनाची चर्चा आणि विविध नव्या ग्रामीण व पायाभूत सुविधा संदर्भातल्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची निर्मिती होत आहे. अनेक ख्यातकिर्त, नामवंत व प्रज्ञावंत असे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संशोधक या तंत्रमहोत्सवात सहभागी होणार असून सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात या महोत्सवाची दखल घेतली जाणार आहे. या तंत्रपरिषदेमुळे संशोधक शास्त्रज्ञाना नवनवीन संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, भारताच्या विकासाच्या दृष्टीने देखील नवे पाऊल पडणार आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com