👁 9 Views

संशोधनातून व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते – बल्गेरियाच्या डॉ. झ्लात्का व्हाजारनिस

पंढरपूर LIVE 15 डिसेंबर 2018

‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या तंत्रपरिषदेमध्ये शोध निबंधांच्या  सादरीकरणाला अभूतपूर्व प्रतिसाद


पंढरपूर– ‘संशोधन हे एक असे अनोखे कार्य आहे की ज्यातून व्यक्ती स्वतःच्या क्षमता
ओळखू शकते. वायरलेस कम्युनिकेशन नेटवर्क सेक्युरिटी आणि मोबाईल
कम्युनिकेशनमध्ये आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे माणसातील संवाद
वाढून रचनात्मक कार्यात गती येवू शकते.’ असे प्रतिपादन बल्गेरियातील सोफिया
विद्यापीठाच्या डॉ. झ्लात्का व्हाजारनिस यांनी केले.
स्वेरीच्या ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण सहा
वेगवेगळ्या हॉलमध्ये शोध निबंधांचे सादरीकरण होत होते. यावेळी शोध निबंध सादर
करताना बल्गेरियातील डॉ. झ्लात्का व्हाजारनिस या संशोधनाबाबत आपले मत व्यक्त
करत होत्या. ट्रेनिंग प्लेसमेंट सेमिनार हॉलमध्ये डॉ. के राजन्ना यांनी आपल्या
सादरीकरणातून ‘संशोधनातून आपल्याला काय पाहिजे यापेक्षा जनतेला कशाची अपेक्षा
आहे? याकडे लक्ष दिल्यास अधिक उपयोगी संशोधन होईल.’असे सांगितले.
    
डॉ. व्ही व्ही
महाजनी, बी.ए.आर.सी.चे हेमंत सोड्डे, इस्त्राईलमधील मुक्त विद्यापीठाच्या डॅना हरारी,
बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. मारिया नेनोवा तसेच पिठाडीया फौंडेशनचे
चेअरमन दिलीप पिठाडिया यांनी शोध निबंध सादर केले. यावेळी जर्मनीचे भारतातील
इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक यांनी सांगितले की,’ भारत हा खरोखरच एक
अतुलनीय देश असून भारताला इतर देशाकडे पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही.
‘मेक इन इंडिया’ हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी
भारतीयांनी त्यांच्यातील उपलब्ध गोष्टीवर विश्वास ठेवून त्या गोष्टींचे विश्लेषण करावे.
त्यातून भारतीयांना प्रगतीचा मार्ग नक्कीच सापडेल.’ महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी
तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर म्हणाले की, ‘ भारत हा खेड्यांचा देश असून
जोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही तो पर्यंत भारताचा विकास झाला असे आपण
म्हणू शकणार नाही. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत
पोहचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध तांत्रिक उपक्रमांची त्यांनी ओळख करून
दिली. तसेच रोहन कळंबकर, विवेक याकुंडी, अनिश गांगल,के.एम.सरोले, एस.जी.
बच्छाव, यु.डी.पाटील, डी.आर.पाटील, वाय एच.नवले, एस.एम. इंगोले, आर.एन.
धनावडे, ए. एस.साळुंखे, व्ही.बी. पाटील,जी.डी. खुसपे, वाय.एच.नवले, एम.ए.चौगुले,
चंचल पाटील, सचिन रुईकर, डॉ. सुनील कुमार, मनोज पाटील, अमोल आडमुठे, ए.जे.


उंबरकर, विजया नन्हा, चेतन, डोंगरसाने, डॉ. डी. महेशकुमार, डॉ. एस. व्ही. संगपाळ,
संजय घोडके, श्रेणिक सरडे, मोनिका माने, विनायक सदरे, जी. सिन्थळ कुमार, निखील
पुरवंत, बापा मोंडाल, संगथोटी हरीबाबू, अमीर देशमुख, महेंद्र गायकवाड, वैभव
गायकवाड, आशिष चाफेकर, सागर सपकाळ, पल्ल्भ सरमठ, तपस देबनाथ,
डी.एम.इनामदार, डॉ.पी.एस. कचरे, राहुल रंजन, सिद्धार्थ कार, एस. प्रदीप, टी.
राजशेखरन सम्यक गांगुर्डे, सांथी कुरूविला, एम. उमाशंकर, श्रुती वडाळकर, डॉ. आर.के.
लाड, पांडुरंग खवाळ, भिमाजी कानवडे, काळूराम लानघे, डॉ. संदीप एल. डॉ. पी.एस.
डांगे, डॉ. एस. डी. शिंदे, स्मिता पाटील, मनोज वाघ, डॉ. प्रविण नेमाडे, मृणाल जोशी,
या संशोधकांनी शोध निबंध सादर केले. यापैकी प्रा. रामदास बिरादार यांनी डीझेल
इंजिनसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याच्या संदर्भातला आपला शोध निबंध सादर
केला. याच बरोबर परदेशी संशोधक अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे डॉ.
संतोष के.सी., बी.ए.आर.सी.चे डॉ. गुलशन रेलहान, डॉ. रमेश जकाती, डॉ. आर.
बालसुब्रमण्यम व रमांकात रात, डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, पुणे येथील डॉ.
दिनेश सिंग ठाकूर, प्रा. जे. एम. चंदरकिशन, इंडस्ट्रीयल एक्स्पर्ट बी.एच. श्रीकांत, भारती
विद्यापीठाचे डॉ. प्रदीप जाधव यांच्यासह आलेल्या इतर अनेक संशोधक प्राध्यापकांनी
आपले शोध निबंध सादर केले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *