👁 7 Views

शरीराचे तुकडे करुन युवकाचा निर्घृण खून

 

भिगवण -तक्रारवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत नदीपात्रालगत तीसवर्षीय युवकाचा हात-पाय, शिरविरहित पाच तुकड्यांमध्ये असलेला मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने अतिशय निर्घृण खून झाल्याची शक्‍यता यातून व्यक्त होत आहे.


मुंडके नसलेल्या शरीराचे पाच तुकडे करून प्लॅस्टिक पिशवीत भरलेले आहेत. विवस्त्र अवस्थेतील या अनोळखी युवकाचे अवयव भिगवण पोलिसांना तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे सहाय्क पोलीस निरीक्षक दिलीप पवार,


पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 9) भिगवण जवळील तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या पुरुषाचा मानेपासून शिर वेगळे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.


या मृतदेहाचे खांद्यापासून दोन्ही हात आणि मांडीपासून दोन्ही पाय वेगळे केलेले शरिराचे अवयव निळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत भरलेले मिळून आले. याबाबतची फिर्याद तक्रारवाडीचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी दिली आहे. ओळखीसाठी खुणा मिळालेल्या अवयवाच्या उजव्या हाताच्या मनगटाच्या पोटरीवर टॅटू काढलेला असून, याबाबत कोणास माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तपासाचे आव्हान!
प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून पाण्यामध्ये असल्याने मृतदेहाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे तुकड्यांमधील शिर नसलेल्या या व्यक्तीच्या संदर्भातील तपास हे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी भिगवणलगत राशीन रोडवरील पुलालगत नदीपात्रात एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणाचे कसब या प्रकरणी पणाला लागणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *