👁 7 Views

पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

 रवींद्र चंद्रकांत किंद्रे (वय 35 रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नर्हे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. 


याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत किंद्रे (वय 80 रा. नांदगाव भोर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


रवींद्र आणि आरोपी महिलेचे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिची एका तरूणासोबत ओळख झाली होती.

 त्यानंतर तिने मित्रासोबत संबंध टिकविण्यासाठी रवींद्रसोबत सातत्याने वाद घातला.


त्याला मारहाण करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून रवींद्रने 17 ऑगस्टला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *