👁 7 Views

पतीचा खून करून फरार झालेली कावेरी शिंदे जेरबंद

पंढरपूर LIVE 21 डिसेंबर 2018


माजलगाव – तालुक्यातील शहाजानपूर येथे अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या कावेरी बालासाहेब शिंदे हिला ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात अटक केली आहे. 

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा  गळा दाबून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह विद्युत कुंपनावर फेकून देत शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तपास चक्रे गतीने फिरवत कावेरी शिंदे हिचा चेहरा जगासमोर आणला होता. तेंव्हापासून कावेरी शिंदे फरार होती. 

ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी सापळा रचून शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात कावेरी शिंदे हिला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, कावेरी शिंदे हिचा प्रियकर विठ्ठल आगे याला घटनेच्या दिवशीची ताब्यात घेतले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *